वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील महत्त्वाच्या विभागांचे कामकाज सध्या अहमदाबादमधून सुरूही झाले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज तेथून होऊ लागले आहे. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात चकरा माराव्या लागत आहेत. या त्रासाला कंटाळून अनेक जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार

कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज दोन शहरांमध्ये विभागले गेल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. यामुळे अनेकांनी अन्य संधींचा शोध सुरू केला आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडील रिक्त जागांची विचारणा करीत असल्याचे दिसत आहे. दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे १० हजार मनुष्यबळ मुंबईत कार्यरत आहे. एसीसीमध्ये सहा हजार तर अंबुजा सिमेंटमध्ये ४,७०० कर्मचारी आहेत, असे सूत्रांनी सांगितले.