नवी दिल्ली : विमान देखभाल आणि दुरूस्ती सेवा क्षेत्रातील एअर वर्क्स ही कंपनी ४०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात संपादित केली जाणार असल्याचे अदानी समूहाकडून सोमवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आले.  

हेही वाचा >>> वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 

illegal parking hawker encroachment outside the premises APMC navi mumbai
‘एपीएमसी’ला अतिक्रमणाचा विळखा; बाजार समितीच्या आवाराबाहेर बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांचे बस्तान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
kinjarapu ram mohan naidu pune marathi news
Air Taxi: ‘एअर टॅक्सी’ची २०२६ मध्ये चाचणी, केंद्रीय नागरी हवाईमंत्री नायडू यांची माहिती
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
ITC Hotels Limited shares listed on the stock exchange print eco news
आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्सचा भाव तीन अंकी सूर मारेल?  बाजारात शेअर्सचे लिस्टिंग येत्या बुधवारी
Reserve Bank of India action against Aviom Housing Finance print eco news
एविओम हाऊसिंग फायनान्सवर रिझर्व्ह बँकेची कारवाई; संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती
Groww app ipo marathi news
शेअर बाजारातील ‘या’ ट्रेडिंग ॲपचा मेगा आयपीओ येतोय
Akshay Kumar sells apartment in Mumbai
अक्षय कुमारने २.३८ कोटींचे अपार्टमेंट विकले तब्बल ‘इतक्या’ कोटीत, अभिनेता झाला मालामाल

अदानी समूहातील, अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एडीएसटीएल) या कंपनीने एअर वर्क्समधील ८५.८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी करार केला आहे. एअर वर्क्स ही विमान देखभाल व दुरूस्ती (एमआरओ) क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. तिचा कार्यविस्तार ३५ शहरांमध्ये असून, एकूण मनुष्यबळ १,३०० इतका आहे. या व्यवहारामुळे अदानी समूहाच्या संरक्षण विमान देखभाल व दुरूस्ती क्षेत्रात क्षमतेत वाढ होणार आहे. देशातील हवाई संरक्षण परिसंस्थेत अदानी समूहाचे स्थान यातून भक्कम होणे अपेक्षित आहे. याचबरोबर देशातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाच्या नियोजित विस्ताराला या व्यवहारामुळे आणखी बळ मिळणार आहे.  

हेही वाचा >>> Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट

एअर वर्क्सकडून हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक सेवा दिल्या जातात. त्यात दुरूस्ती, तपासणी, अंतर्गत रचना व फेरबदल, रंगकाम याचबरोबर मालमत्ता व्यवस्थापन या सेवांचा समावेश आहे. कंपनीकडून होसूर, मुंबई आणि कोची येथील सुविधांमध्ये विमानांची दुरूस्ती आणि देखभाल केली जाते. कंपनीने यासाठी वीसहून अधिक देशांतील हवाई वाहतूक नियामकांकडून आवश्यक परवानगी मिळविली आहे.

Story img Loader