Mauritius Minister Hindenburg Shell Companies : हिंडेनबर्ग अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदाणी समूहाला आज मॉरिशसकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने मॉरिशसमध्ये त्यांच्या ‘शेल’ कंपन्यांच्या उपस्थितीबद्दल अदाणी समूहावर केलेले आरोप ‘खोटे आणि निराधार’ आहेत, असं मॉरिशसचे आर्थिक सेवा मंत्री महेन कुमार सेरुत्तून यांनी आपल्या देशाच्या संसदेत सांगितले. मॉरिशस OECD आदेशित कर नियमांचे पालन करत असल्याचेही अधोरेखित केले. २४ जानेवारीला हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदाणी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्जाधीश गौतम अदाणी यांनी त्यांच्या भारतीय सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरच्या किमतींमध्ये फेरफार करण्यासाठी मॉरिशसस्थित शेल कंपन्यांचा वापर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता. शेल कंपनी ही एक निष्क्रिय फर्म असते, जी विविध आर्थिक हालचालींसाठी वापरली जाते.

मॉरिशस कायदा शेल कंपन्यांना परवानगी देत ​​नाही – महेन

आर्थिक सेवा मंत्री महेन कुमार सेरुत्तून यांनी संसदेत एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली. मॉरिशसस्थित संस्थांना मनी लाँड्रिंग आणि अदाणी समूहाच्या शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासाठी हिंडेनबर्गच्या आरोपाबद्दल काय म्हणायचे आहे, याविषयी एका खासदाराने लेखी विचारले होते. यावर मंत्री म्हणाले की, देशाचा कायदा शेल कंपन्यांना परवानगी देत ​​नाही. आतापर्यंत देशात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलेले नाही.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Case against Kejriwal Officials claim that Lieutenant Governor gave permission
केजरीवाल यांच्याविरोधात खटला? नायब राज्यपालांनी परवानगी दिल्याचा अधिकाऱ्यांचा दावा; ‘आप’कडून खंडन
Congress state president Nana Patole made serious allegations against state government
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”

अदाणी समूहाविरुद्धच्या आरोपांची चौकशी न्यायालयाच्या विचाराधीन

हिंडेनबर्ग अदाणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वीच मॉरिशसच्या अर्थमंत्र्यांचे हे विधान आले आहे. न्यायालयाने नियामक समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. भांडवली बाजार नियामक सेबीने अदाणी समूहाविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी मुदत सहा महिने वाढवण्याच्या याचिकेवर न्यायालय विचार करण्याची शक्यता आहे.

सेबीही तपास करीत आहे

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) अदाणी समूह आणि दोन मॉरिशस आधारित कंपन्या ग्रेट इंटरनॅशनल टस्कर फंड आणि आयुष्मान लिमिटेड यांच्यातील संबंधांचे मूल्यांकन करीत आहे, ज्यांनी अदाणी समूहाच्या प्रमुख कंपनीच्या नुकत्याच रद्द केलेल्या शेअर्सच्या विक्रीत गुंतवणूकदार म्हणून भाग घेतला.

Story img Loader