Mauritius Minister Hindenburg Shell Companies : हिंडेनबर्ग अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदाणी समूहाला आज मॉरिशसकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने मॉरिशसमध्ये त्यांच्या ‘शेल’ कंपन्यांच्या उपस्थितीबद्दल अदाणी समूहावर केलेले आरोप ‘खोटे आणि निराधार’ आहेत, असं मॉरिशसचे आर्थिक सेवा मंत्री महेन कुमार सेरुत्तून यांनी आपल्या देशाच्या संसदेत सांगितले. मॉरिशस OECD आदेशित कर नियमांचे पालन करत असल्याचेही अधोरेखित केले. २४ जानेवारीला हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदाणी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्जाधीश गौतम अदाणी यांनी त्यांच्या भारतीय सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरच्या किमतींमध्ये फेरफार करण्यासाठी मॉरिशसस्थित शेल कंपन्यांचा वापर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता. शेल कंपनी ही एक निष्क्रिय फर्म असते, जी विविध आर्थिक हालचालींसाठी वापरली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा