अहमदाबाद : अदानी समूह ४० गिगावॉट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी २०३० पर्यंत २ लाख कोटी रुपये, तर आणखी १.३ लाख कोटींची गुंतवणूक समूहातील अन्य कंपन्यांत करण्याचे नियोजन मंगळवारी जाहीर करण्यात आले. समूहाने सर्वच व्यवसायांतील कर्ब उत्सर्जन शून्य टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट आखले आहे.

सध्या समूहाचे १० गिगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेले अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आहेत. त्यात सौरऊर्जा आणि पवनऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. समूहाकडून दरवर्षी स्थापित क्षमतेत ६ ते ७ मेगावॉटची भर घालण्यात येणार असून, २०५० पर्यंत ५० मेगावॉट क्षमतेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. एक मेगावॉट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे २०३० पर्यंत समूहाला २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे, अशी माहिती अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी यांनी दिली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
sensex breaches 78000 mark for 1st time nifty at record high as bank stocks surge
Stock Market Today : ७८ हजारांचे शिखरही सर
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

हेही वाचा >>> Stock Market Today : ७८ हजारांचे शिखरही सर

अदानी समूहाकडून चालू आर्थिक वर्षात १.३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक समूहातील कंपन्यांत करण्यात येणार आहे. समूहाने पुढील ७ ते १० वर्षांत कंपन्यांमध्ये १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आखले आहे, अशी माहिती अदानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी मंगळवारी दिली.

सिंग म्हणाले की, अदानी समूहातील बंदर ते ऊर्जा, विमानतळ, कमोडिटी, सिमेंट व माध्यम क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक केली जाईल. यापैकी काही गुंतवणूक अंतर्गत गंगाजळीतून, तर उर्वरित निधी कर्जरूपाने उभारला जाईल. यंदा मुदत संपत असलेल्या ३ ते ४ अब्ज डॉलरच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा समूहाचा विचार आहे. यातून प्रकल्प अर्थसाहाय्यासाठी १ अब्ज डॉलरचा निधी उभा केला जाईल. बरोबरच २ ते २.५ अब्ज डॉलर समभाग विक्री करून मिळविले जातील. यंदा प्रकल्प पूर्णत्वावर भर दिला जाणार आहे, असे सांगून सिंग म्हणाले की, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अदानी ग्रीन कंपनी ६ ते ७ मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण करेल.