Adani Group Sells Stake : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदाणी यांनी तीन समूह कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून १.३८ अब्ज डॉलर ( ११,३३० कोटी रुपये) जमवले आहेत. गेल्या चार वर्षांत अदाणी समूहाने नऊ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारला आहे आणि विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. “परिवर्तनीय भांडवल व्यवस्थापन कार्यक्रमाच्या १० वर्षांच्या रोडमॅपची पूर्तता करण्यासाठी पैसे जमवण्यास वचनबद्ध आहोत,” असंही बंदर ते ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या समूहाने एका निवेदनात म्हटले आहे. हा कार्यक्रम २०१६ मध्ये विविध पोर्टफोलिओ कंपन्यांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
उभारलेले भांडवल कर्ज आणि इक्विटी वचनबद्धतेची पूर्तता करणार
अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाल्यास अदाणी कुटुंबाने अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड या तीन पोर्टफोलिओ कंपन्यांमधील भागविक्रीद्वारे १.३८ अब्ज डॉलर (११३३० कोटी रुपये) उभारले आहेत. हे पुढील एक ते दीड वर्षात समूहासाठी भांडवलाची उच्च उपलब्धता सुनिश्चित करणार आहेत, तसेच पोर्टफोलिओ कंपन्यांसाठी कर्ज आणि इक्विटी वचनबद्धतेची पूर्तता करण्यात मदत होणार आहे. याव्यतिरिक्त तीन पोर्टफोलिओ कंपन्यांना गुंतवणूकदारांना समभाग विक्रीच्या मार्गाने प्राथमिक इश्यूसाठी बोर्ड मान्यतादेखील मिळाली आहे.
हिंडेनबर्ग अहवालामुळे अदाणी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल घसरले
अमेरिकेतील संशोधन आणि कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी समूह कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली. या आरोपांवर मात करण्यासाठी समूह आता पुनरागमनाच्या रणनीतीवर काम करीत आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड गुंतवणूकदारांना शेअर विक्रीद्वारे १२,५०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे, तर पॉवर ट्रान्समिशन कंपनी अदाणी ट्रान्समिशन ८,५०० कोटी रुपये उभारणार आहे. त्याची अक्षय ऊर्जा शाखा १२,३०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
अदाणी समूहाला एफपीओ मागे घ्यावा लागला
अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी एंटरप्रायझेसला त्याचे २०,००० कोटी रुपये फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग(FPO)मधून काढून घ्यावे लागले. ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली असली तरी कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत केलेत. अमेरिकन शॉर्ट सेलरने जानेवारीमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदाणी समूहावर अकाउंटिंग फसवणूक आणि स्टॉकच्या किमतीत हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. मात्र, अदाणी समूहाने हे आरोप फेटाळून लावले. अदाणी समूहाने २०१९ मध्ये त्याच्या मूळ पायाभूत सुविधा पोर्टफोलिओसाठी भांडवली परिवर्तनाचा प्रवास सुरू केला, असे एका निवेदनात म्हटले आहे.
अदाणी समूहाने चार वर्षांत नऊ अब्ज डॉलर्स उभे केले
या समूहाने चार वर्षांच्या अल्प कालावधीत ९ अब्ज डॉलरहून अधिक निधी उभारला आहे. समूहाने विविध सूचीबद्ध संस्थांचे अधिग्रहण केले आहे. अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड, अदाणी टोटल गॅस लिमिटेड आणि अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.