अदाणी समूहाच्या वार्षिक अहवालात गौतम अदाणी यांनी शॉर्ट सेलिंगच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी यूएस शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ताळेबंद, मालमत्ता आणि ऑपरेटिंग कॅशफ्लो आता पूर्वीपेक्षा चांगले आहेत आणि सतत मजबूत होत आहेत. जेव्हा आम्ही देशातील सर्वात मोठा FPO लॉन्च करणार होतो, तेव्हा हा अहवाल प्रकाशित झाला. खोट्या आरोपांवर आधारित हा अहवाल आम्हाला टार्गेट करून प्रसिद्ध करण्यात आला, असंही अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणींनी सांगितले. अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या वार्षिक अहवालात शेअर होल्डर्सना संबोधित करताना गौतम अदाणी बोलत होते.
हिंडेनबर्गने केले होते अनेक आरोप
जानेवारीच्या उत्तरार्धात अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदाणी समूहावर एक अहवाल प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये समूहाने शेअर्सच्या मूल्यात हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीने वाढ केली असल्याचे म्हटले होते. “सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने आमच्या ग्रुपवरच्या आरोपांची सत्यता तपासली आणि त्यात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळले नाही, सेबीला येत्या काही महिन्यांत आपला अहवाल सादर करायचा आहे, तरीही आम्हाला आमच्या व्यवस्थापनावर विश्वास आहे”, असंही ते म्हणालेत. सुप्रीम कोर्टाने एक पॅनल स्थापन करून समभागांच्या बाजारमूल्याबाबत अनियमितता झाल्याचं तपास केला, परंतु सुप्रीम कोर्टानंही त्यांना दिलासा दिलाय.
हेही वाचाः महागाईत टोमॅटोचे भाव भरमसाठ वाढले, १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले; जाणून घ्या कारण
शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा उद्देश कंपनीची विश्वासार्हता कमी करून नफा मिळवणे हा होता. एफपीओ पूर्णपणे भरूनही आम्ही गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेतले आणि त्यांना परत केले. तज्ज्ञ समितीला कोणत्याही नियामक त्रुटी आढळल्या नाहीत. समितीला नियमांचे पालन न केल्याचे किंवा उल्लंघन केल्याचे कोणतेही उदाहरण आढळले नाहीत. सेबीने अद्याप आपला अहवाल सादर केला नसला तरी आम्हाला आमच्या प्रशासनावरील मानकांवर पूर्ण विश्वास आहे. हिंडेनबर्ग यांच्या आरोपांनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३ मार्च रोजी तपासाबाबत आदेश जारी केला होता आणि त्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापनाही करून आम्हाला दिलासा दिला होता, असंही गौतम अदाणींनी सांगितलं.
हेही वाचाः देशाला आज मिळाली ५ वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा