अदाणी समूह पुढील १० वर्षांत हरित ऊर्जा संक्रमणा(Green Energy Transition)मध्ये १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अदाणी समूहाने मंगळवारी (१२ डिसेंबर) ६ महिन्यांचा ईएसजी संग्रह जारी केला. अदाणी समूहाच्या डिकार्बोनायझेशन मार्गावर कशा पद्धतीनं लक्षणीय प्रगती सुरू आहे हे पाहायला मिळतेय. जागतिक निव्वळ शून्य लक्ष्य साध्य करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणामध्ये गौतम अदाणी समूह आघाडीवर आहे. समूहाने अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी एनर्जी सोल्युशन्स, अदाणी पोर्ट्स अँड SEZ, ACC आणि अंबुजा सिमेंट या पाच पोर्टफोलिओ कंपन्यांसाठी २०५० पर्यंत किंवा त्यापूर्वी नेट शून्य होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अंबुजा सिमेंट ही भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपरदेखील आहे.
कॉर्पोरेट धोरणावर आधारित गुंतवणुकीची तपासणी करण्यासाठी आणि कंपन्यांना जबाबदारीने काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ESG किंवा पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन मापदंडांचा वापर केला जातो. अदाणी समूह पुढील १० वर्षांत हरित ऊर्जा संक्रमणामध्ये १०० अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, अदाणी पोर्टफोलिओ बिझनेसचे डी-कार्बोनायझेशन २०३० पर्यंत १०० दशलक्ष झाडे लावणे आणि हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक ट्रकच्या विकासासह नावीन्यपूर्ण पायलट प्रकल्प सुरू करण्याचे सक्रिय धोरण आहे.
हेही वाचाः SpiceJet शेअर्स विकून २२५० कोटी रुपये उभारणार
याबरोबरच समूहाने गुजरातच्या पश्चिम किनार्यावर जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पात समाविष्ट असलेल्या ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीम विकसित करण्याचे धोरणही स्पष्ट केले आहे. ही परिसंस्था पूर्णपणे एकात्मिक मूल्य साखळीवर आधारित आहे. तसेच निव्वळ शून्य संक्रमणासाठी रोडमॅपसाठी लास्ट-माईल ग्रीन हायड्रोजन सोल्यूशन्सची आवश्यकता असेल. ग्रीन हायड्रोजन सोल्यूशन्स सक्षम करण्यासाठी अदाणी समूह मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा आणि एंड-टू-एंड EPC (इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) क्षमतांनी सुसज्ज आहे.
हेही वाचाः नवे रोजगार निर्माण करणे हे भारतासमोरील मोठे आव्हान, रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता
अदाणी एनर्जी सोल्युशन्स
अदाणी एनर्जी सोल्युशन्सची उपकंपनी असलेल्या ‘अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई’ने आपला अक्षय ऊर्जा हिस्सा ३८.३ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यासह मुंबई सर्व मेगासिटीजमध्ये अक्षय ऊर्जा खरेदी करणारा आघाडीवर बनला आहे. पोर्टफोलिओ कंपन्या अदाणी एनर्जी सोल्युशन्स आणि अदाणी ग्रीन एनर्जी यांच्यातील सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.
अदाणी ग्रीन एनर्जी
अदाणी ग्रीन एनर्जी ही जगातील सर्वोच्च रेट असलेली युटिलिटी कंपनी आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत अक्षय ऊर्जा कंपनीने सर्व कार्यरत साइट्ससाठी लँडफिल्समध्ये शून्य कचरा करण्याचे लक्ष्य गाठले आहे.