Investment in Telangana : अदाणी समूहाने तेलंगणात १२४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदाणी समूह यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात.

५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून १०० मेगावॅट डेटा सेंटर बांधण्यात येणार

तेलंगणा सरकारच्या मते, या गुंतवणुकीमुळे राज्याची आर्थिक प्रगती आणखी वाढेल. तसेच तेलंगणात हरित ऊर्जा विकासाच्या दिशेने अधिक चांगले काम करता येईल. अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडने ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्यात १०० मेगावॅटचे डेटा सेंटर तयार करण्याचे मान्य केले आहे. ते हरित ऊर्जेने प्रकाशित होणार आहे. साधारण ५ वर्षांत हे डेटा सेंटर तयार होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि स्टार्टअप्सचीही मदत घेतली जाईल, जे पुरवठादार म्हणून त्यात सामील होतील. यामुळे सुमारे ६०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील
Exports of the country crossed the mark of 800 billion dollars
देशाची निर्यात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल!

हेही वाचाः अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा? अर्थमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

दोन पंप स्टोरेज प्रकल्प आणि सिमेंट प्लांटही सुरू होणार

याशिवाय अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड राज्यात सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दोन पंप केलेले स्टोरेज प्रकल्पदेखील बांधणार आहे. यापैकी ८५० मेगावॅटचा एक प्रकल्प कोयाबेस्टागुडम येथे तर दुसरा ५०० मेगावॅटचा प्रकल्प नाचाराम येथे सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच अंबुजा सिमेंट ५ वर्षांत १४०० कोटींच्या गुंतवणुकीसह ६ MTPA क्षमतेचा प्लांटदेखील उघडणार आहे. हे युनिट ७० एकरांवर पसरणार आहे. यातून सुमारे चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : SIP चे ४ मोठे फायदे माहीत आहेत का? जर तुम्ही ‘या’ चुका केल्या तर…

अदाणी समूह ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालीमध्येही गुंतवणूक करणार

अदाणी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीजने १० वर्षांत राज्यात सुमारे १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. या रकमेतून अदाणी एरोस्पेस पार्कमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालीचे संशोधन, विकास, डिझाइन, उत्पादन आणि एकत्रीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे एक हजार लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.