अब्जाधीश उद्योगपती गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील अदाणी समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड(Quintillion Business Media)मधील उर्वरित ५१ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अदाणी समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेसच्या वतीने शेअर बाजाराला ही माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदाणी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्सच्या बोर्डाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५१ टक्के शेअर्स घेण्यासाठी सामंजस्य करार मंजूर केला आहे, असे एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. आर्थिक आणि व्यावसायिक बातम्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म क्विंटिलियन बिझनेस मीडियाद्वारे चालवले जाते.

हेही वाचाः पवार काका-पुतण्यांची चोरडियांच्या घरी भेट, पण ते आहेत तरी कोण? डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही व्यावसायिक संबंध

एनडीटीव्हीच्या आधी क्विंटिलियन बिझनेस मीडियामध्ये शेअर विकत घेतले होते

NDTV मधील ६५ टक्के शेअर खरेदी करण्यापूर्वी अदाणी ग्रुपने क्विंटिलियन बिझनेस मीडियामधील ४९ टक्के शेअर्स ४७.८४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. बीक्यू प्राइम पूर्वी ब्लूमबर्ग क्विंट म्हणून ओळखले जात होते. अमेरिकन मीडिया कंपनी ब्लूमबर्ग आणि क्विंटिलियन मीडिया यांचा हा संयुक्त उपक्रम होता. संपादन पूर्ण झाल्यानंतर क्विंटिलियन बिझनेस मीडिया ही अदाणी समूहाची मीडिया (AMG) नेटवर्क्सची उपकंपनी बनणार आहे, अदाणी समूहाने मे २०२२ मध्ये AMG मीडियाच्या वतीने क्विंटिलियन बिझनेस मीडिया लिमिटेडच्या संपादनासाठी क्विंटिलियन मीडिया लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे.

हेही वाचाः ‘या’ अब्जाधीशाची पत्नी होती टाटा मोटर्सची पहिली महिला अभियंता, जेआरडी टाटांना लिहिले संतप्त पत्र अन् घडला ऐतिहासिक बदल

संजय पुगलिया यांनी एएमजी मीडिया नेटवर्क स्थापन केले

सप्टेंबर २०२१ मध्ये ज्येष्ठ पत्रकार संजय पुगलिया यांना अदाणी समूहाने अदाणी मीडिया व्हेंचर्सचे प्रमुख बनवले. यानंतर अदाणी समूहाचा प्रसार माध्यमांमध्ये झपाट्याने प्रभाव अन् विस्तार वाढला आणि क्विंटिलियन बिझनेस मीडियाशिवाय एनडीटीव्ही यांसारख्या मोठ्या मीडिया हाऊस कंपनीसुद्धा अदाणी समूहाने विकत घेतल्या.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani group will now buy 51 percent stake in quintillion business media board approved vrd