अदाणी हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा वेळ मागितली आहे. या प्रकरणावर पुरेसे काम झाले असून, १५ दिवसांनी अहवाल सादर केला जाईल, असंही बाजार नियामक सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. SEBI अदाणी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करीत आहे, ज्यात शेअर बाजारातील कथित फेरफार अन् शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गच्या मोडस ऑपरेंडी यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत सेबीला वेळ दिला होता आणि सुनावणीची तारीख २९ ऑगस्ट निश्चित केली होती. याचा अर्थ सेबी आता २९ ऑगस्ट रोजीच या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. यापूर्वी ऑडिटर फर्म डेलॉइटने अदाणी सेझच्या लेखापरीक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सोमवारी अदाणी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑडिटर फर्म डेलॉइटने राजीनामा सादर केला

यापूर्वी ऑडिटर फर्म डेलॉइट यांनी अदाणी पोर्ट अँड सेझच्या लेखापरीक्षकपदाचा राजीनामा सादर केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी डेलॉइटने अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांची स्वतंत्र बाहेरून चौकशी करण्याची मागणी केली होती. कंपनीने म्हटले आहे की, या आरोपांचा तिच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि ऑडिटर फर्म डेलॉईटने पदाचा राजीनामा देऊन बाहेर जाण्याचे कारण समाधानकारक नाही.

हेही वाचाः डॉलरच्या तुलनेत रुपया १० महिन्यांच्या नीचांकावर; ८३ च्या खालच्या पातळीवर घसरण

अदाणी पोर्ट्स अँड स्पेस इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने शेअर बाजाराला पाठवलेल्या १६३ पानांच्या अहवालात Deloitte Haskins & Sells LLP चा राजीनामा पाठवला आहे. APSEZ ने सांगितले की, बैठकीत Deloitte अधिकार्‍यांनी अदाणी समूहाच्या इतर सूचीबद्ध कंपन्यांच्या लेखापरीक्षकांप्रमाणे सर्वसमावेशक लेखापरीक्षण भूमिका नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

हेही वाचाः Twitter वरून कमाई करताय, मग तुम्हाला ‘एवढा’ टक्के जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

अदाणी समूहाच्या कंपन्यांचे समभाग घसरले

सोमवारी अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदाणी एंटरप्रायझेसचा शेअर ४.५० टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करीत आहे. दुसरीकडे अदाणी पोर्ट आणि SEZ च्या स्टॉकमध्ये २.७५ टक्क्यांची घसरण होत आहे. अदाणी पॉवर, अदाणी ग्रीन आणि अदाणी टोटल गॅस आणि अदाणी विल्मारचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक आणि अदाणी ट्रान्समिशन ३.५० टक्क्यांनी घसरले आहेत. सिमेंट कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास एसीसीच्या शेअरमध्ये २ टक्के आणि अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये ३.५० टक्के घट झाली आहे. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.