सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बाजार नियामक सेबीला अदाणी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी १४ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच न्यायालयाने सेबीला १४ ऑगस्टपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तपासाच्या स्थितीबद्दल विचारले असता, सेबीचे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, “तपास आपल्या गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनीसुद्धा याचिकाकर्त्यांची बाजू मांडलीय. सेबीचे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तपासासाठी अतिरिक्त वेळ मागितला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तपासाला आधीच मुदतवाढ दिल्याचे सांगितले. न्यायालयाने सेबीला १४ ऑगस्ट रोजी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एक दिवसापूर्वी सेबीने कोर्टात ४३ पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
अदाणी हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, १४ ऑगस्टपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले
सर्वोच्च न्यायालयाने तपासाला आधीच मुदतवाढ दिल्याचे सांगितले. न्यायालयाने सेबीला १४ ऑगस्ट रोजी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एक दिवसापूर्वी सेबीने कोर्टात ४३ पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
Written by बिझनेस न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-07-2023 at 17:57 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani hindenburg case the supreme court directed sebi to submit its investigation report by 14 august 2023 vrd