गौतम अदाणी आणि त्यांचा अदाणी समूह पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच तो निधी उभारण्याबरोबरच गुंतवणुकीवर भर देत आहे. खरं तर गौतम अदाणींनी संकटातून जात असलेल्या अनिल अंबानींचा कोळसा ऊर्जा प्रकल्प विकत घेण्याची योजना आखली आहे. सध्या दिवाळखोरी न्यायालयाद्वारे अंबानींच्या प्रकल्पाचा लिलाव केला जात आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड असे या पॉवर प्लांटचे नाव आहे. विशेष म्हणजे २.८ अब्ज डॉलर्सचा निधी उभारलेल्या गौतम अदाणींना मध्य भारतात ६०० मेगावॅट उत्पादन करणाऱ्या विदर्भ इंडस्ट्रीज विकत घेण्यासाठी कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.

पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्याचा विचार

दुसरीकडे रिलायन्स पॉवर लिमिटेड हा प्लांट परत मिळवण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या विचारात आहे. अदाणी आणि रिलायन्स पॉवर या दोघांनी अद्याप औपचारिक प्रस्ताव आणणे बाकी आहे. परंतु यावर रिलायन्सने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, तर अदाणी समूहाच्या प्रवक्त्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जर अदाणी पॉवर प्लांट मिळवण्यात यशस्वी झाले, तर तो कोळसा ऊर्जा प्रकल्पांच्या पोर्टफोलिओमध्ये तो भर घालणार आहे. अदाणी समूह जानेवारीमध्ये आलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोपांतून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकन शॉर्ट सेलरच्या अहवालानंतर अदाणी समूहाच्या बाजारमूल्यात प्रचंड घसरण झाली होती.

हेही वाचाः “ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के GST असंवैधानिक”, उद्योगतज्ज्ञांची नाराजी; म्हणाले, ”अनेकांच्या नोकऱ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल अंबानींची स्थिती कमकुवत होणार

विदर्भ इंडस्ट्रीज दुसऱ्या कंपनीकडे गेल्यास अंबानींची स्थिती आणखीनच कमकुवत होणार आहे. एकेकाळी अनिल अंबानी हे देशातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांपैकी एक होते. मात्र कंपन्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर ते अनेक वर्षांपासून स्वतःला कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अदाणी आपल्या ऊर्जा प्रकल्पांचा विस्तार करण्याचा विचार करीत आहे.

हेही वाचाः जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी