Hindenburg Research Shut Down : हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गुरुवारी, १६ जानेवारी रोजी अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसईवर अदाणी पॉवरचे शेअर्स ९ टक्के वाढून दिवसाच्या उच्चांकी ५९९.९० रुपयांवर, अदाणी ग्रीन एनर्जी ८.८ टक्के वाढून १,१२६.८० रुपयांवर, अदाणी एंटरप्रायझेस ७.७ टक्के वाढून २,५६९.८५ रुपयांवर आणि अदाणी टोटल गॅसमध्ये ७ टक्के वाढ होऊन ७०८.४५ रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे अदाणी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर ६.६ टक्के वाढून ८३२.०० रुपयांवर तर अदाणी पोर्ट्सचा शेअर ५.५ टक्के वाढून १,१९० रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये ४.५ टक्क्यांची आणि अदाणी विल्मरच्या शेअर्समध्ये ०.५ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंडनबर्गमुळे अदाणी समूहाला बसला होता फटका

हिंडनबर्ग रिसर्चने दोन वर्षांपूर्वी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या कंपन्यांविषयी काही अहवाल प्रसिद्ध केले होते. या अहवालांमुळे अदाणी समूहाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते. हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहाला लक्ष्य करत २०२३ मध्ये असे अहवाल प्रकाशित केले ज्यामुळे गौतम अदाणींना मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागले होते. हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदाणी समूहाच्या बाजार मूल्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. पण, नंतर अदाणी समूहाने शेअर बाजारातील बहुतेक तोटा भरून काढला.

सत्याची वाट आम्ही सोडली नाही…

हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी आज एक्सवर एक पोस्ट लिहून कंपनी बंद करत असल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “आम्ही जे काही ठरवले होते ते पूर्ण झाल्याने आता आम्ही कंपनी बंद करत आहोत.”

नॅथन अँडरसन आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, “भ्रष्टाचार, खोटेपणा, गैरव्यवहार यावर आम्ही पुराव्यांसह प्रहार केले. आम्ही असे लढे दिले आहेत जे कोणत्याही व्यक्ती किंवा साम्राज्यापेक्षा मोठे आहेत. कारण हे लढे सत्य समोर आणण्यासाठी होते. लबाडी, भ्रष्टाचार, नकारात्मकता याचा सुरुवातीचा परिणाम हा प्रभावीच वाटतो, पण सत्याची वाट आम्ही सोडली नाही, त्यामुळे ही वाटचाल करु शकलो. तसेच आम्ही काही साम्राज्यांना धक्के देण्याचे कामही केले आहे. आम्ही केलेल्या या कामामुळे किमान १०० व्यक्तींच्या विरोधात दिवाणी खटले दाखल झाले आहेत. ज्यामध्ये काही अब्जाधीश आणि उच्चभ्रूंचा समावेश आहे.”