नवी दिल्ली : आशियाई विकास बँकेने (एडीबी) आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचे अनुमान ७ टक्के असा पूर्वअंदाजित पातळीवरच कायम ठेवले आहे. याआधी सप्टेंबरमध्येदेखील तिने ७ टक्क्यांच्या विकास दराचा कयास वर्तविला होता. पुढील आर्थिक वर्षांसाठीही (२०२३-२४) वृद्धीदर आधी अंदाजलेल्या ७.२ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत अंदाज कायम ठेवला असला तरी एकूण आशियाच्या विकासदरात मात्र घसरण होण्याचा कयास ‘एडीबी’ने वर्तविला आहे. सध्या आशियाई अर्थव्यवस्था ४.२ टक्के वेगाने विस्तार साधेल, असे तिचे अनुमान आहे. याआधी बँकेने ४.३ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला होता. तर पुढील वर्षांसाठी तो ४.९ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजित विस्ताराशी तुलना करता ४.६ टक्के राहील, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adb projected 7 percent india s gdp for the fiscal year 2022 23 zws