पुणे : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एबीएचएफएल) कंपनीने चालू आर्थिक वर्षात व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) २५ ते ३० टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील तीन वर्षांत व्यवस्थापनाखालील मालमत्ता दुपटीने वाढविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज गाडगीळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राहणीमानाच्या खर्चाचा पगारावर प्रभाव नाही: सर्वेक्षण; पुणे नोकरीच्या दृष्टीने सुरक्षित शहर

कंपनीच्या कामगिरीबाबत बोलताना गाडगीळ म्हणाले की, कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता मार्च २०२४ अखेरपर्यंत १८ हजार ४२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची वाढ ३३ टक्के असून, त्या तुलनेत गृहकर्ज क्षेत्राची वाढ १५ टक्के आहे. गृहकर्ज क्षेत्रात कंपनीला विस्तारासाठी खूप वाव आहे. पुण्याचा विचार करता या क्षेत्रात कंपनीचा हिस्सा ६.५ टक्के आहे. कंपनीचा भर हा प्रामुख्याने परवडणाऱ्या घरांवर आहे. कंपनीच्या एकूण कर्ज वितरणापैकी ४१ टक्के परवडणाऱ्या घरासांठी झालेले आहे. आदित्य बिर्ला समूह या पालक कंपनीमुळे एबीएचएफएलच्या वाढीला गती मिळत आहे. समूहाच्या व्यवसाय जाळ्याचा फायदा कंपनीला होत आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल हा मंच १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यावर एक लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. पुढील तीन वर्षांतील ही संख्या तीन कोटींपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya birla housing finance target to double its business growth print eco news zws
Show comments