देशातील सर्वात नावाजलेली आणि मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मुकेश अंबानी यांना पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२९ पर्यंत कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी बनवण्यासाठी भागधारकांकडून मंजुरी मागितली आहे. यादरम्यान मुकेश अंबानी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा पगार (Mukesh Ambani Salary 2029) घेणार नाहीत. सध्या मुकेश अंबानी यांचे वय ६६ वर्षे आहे. कंपनी कायद्यानुसार, जर एखाद्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी व्यक्तीला ७० वर्षांनंतरही कंपनीचे प्रमुख म्हणून कायम राहायचे असेल, तर त्यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष ठराव आवश्यक आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास १९ एप्रिल २०२४ पासून मुकेश अंबानी यांचा एमडी आणि अध्यक्ष म्हणून नवीन कार्यकाळ सुरू होणार आहे.
विशेष ठरावात काय म्हटले होते?
रिलायन्सच्या या विशेष प्रस्तावात म्हटले आहे की, मुकेश अंबानी १९ एप्रिल २०२७ पर्यंत ७० वर्षांचे होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अनेक पटींनी वाढली आहे. ते कंपनीचे नेतृत्व करत राहणे कंपनीच्या हिताचे आहे. या कारणास्तव त्यांचा कार्यकाळ आणखी ५ वर्षांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
हेही वाचाः डीएबाबत आनंदाची बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच वाढण्याची शक्यता
मुकेश अंबानी १९७७ पासून रिलायन्सच्या संचालक मंडळावर
मुकेश अंबानी १९७७ पासून रिलायन्सच्या संचालक मंडळावर आहेत आणि वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर २००२ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून आजतागायत ते या पदावर सतत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कंपनीला बाजारमूल्य, नफा आणि कमाई अनेक पटींनी वाढवण्यात यश आले आहे.
हेही वाचाः कांदा रडवणार? टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता
कोरोना काळापासून पगार घेतला नाही
आर्थिक वर्ष २००८-०९ ते २०१९-२० या आर्थिक वर्षापासून मुकेश अंबानींना रिलायन्सकडून वार्षिक १५ कोटी रुपये पगार मिळत होता, पण कोरोनामुळे त्यांनी त्यावर पाणी सोडले.