मुंबई: शापूरजी पालनजी समूहातील पायाभूत सुविधा विकासातील ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रति समभाग ४४० ते ४६३ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून कंपनीला ५,४३० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. ही समभाग विक्री शुक्रवार, २५ ऑक्टोबरला खुली होत असून, २९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना समभागांसाठी बोली लावता येईल.

हेही वाचा >>> मुंबईसह महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांत २,००० कोटींच्या गुंतवणुकीचे एम्मार इंडियाचे नियोजन

Preloved Eco Haat, used products, clothes,
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी…
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Mumbai stock market index Sensex falls
‘निफ्टी’ २५ हजारांखाली; ‘सेन्सेक्स’मध्ये तीन शतकी घसरण
Disinvestment of 5 percent stake in Cochin Shipyard through OFS
कोचीन शिपयार्डच्या ५ टक्के हिश्शाची ‘ओएफएस’च्या माध्यमातून निर्गुंतवणूक; ८ टक्के सवलतीसह प्रत्येकी १,५४० रुपयांनी समभाग विक्री
Dnyanradha Multistate Society, 1000 crores frozen,
ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या कार्यालयांवर ईडीचे छापे; मालमत्ता, रोख मिळून १ हजार कोटी गोठवले
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
Ola Electric shares price
ओला इलेक्ट्रिक शंभरखाली, तर पेटीएमच्या समभागांची सर्वोत्तम झेप
huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार

या आयपीओच्या माध्यमातून ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे विद्यमान भागधारक त्यांच्याकडील समभाग विकणार (ओएफएस) असून, नवीन समभागांचीही विक्री केली जाणार आहे. यात १,२५० कोटी रुपये नवीन समभाग विकून आणि ओएफएसच्या माध्यमातून ४,१८० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे. आयपीओ-पूर्व कंपनीने ३,००० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत. आयपीओमध्ये सहभागासाठी किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार किमान ३२ समभाग आणि त्यानंतर त्याच पटीत समभागांसाठी बोली लावणारा अर्ज दाखल करू शकतील.

हेही वाचा >>> इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ

सागरी व औद्योगिक पायाभूत सुविधा, वाहतूक, नागरी पायाभूत सुविधा आणि तेल नैसर्गिक वायू क्षेत्रात विस्तार असलेल्या ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २१ किलोमीटर लांबीच्या बोगदा मार्गाचे महत्त्वपूर्ण काम आहे. या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधीपैकी ८० कोटी रुपयांचा वापर बांधकाम उपकरणांच्या खरेदीसाठी भांडवली खर्च म्हणून केला जाईल. याचबरोबर दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी ३२० कोटी रुपये आणि कर्जफेडीसाठी ६०० कोटी रुपयांचा वापर केला जाईल.