Ambani and ED : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल अंबानींची चौकशी केली आणि आता त्याचे धागेदोरे त्यांच्या पत्नी टीना अंबानींपर्यंत पोहोचले आहेत. टीना अंबानी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असून, त्या मंगळवारी सकाळी ईडीच्या मुंबई कार्यालयात पोहोचल्या होत्या. इथेच त्यांची चौकशी झाली. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानींना गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींनी घेरलं आहे. त्यांच्या समूहातील अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यात. अनेकांनी त्यांना कंपन्यांची विक्री करण्यास भाग पाडलेय, विशेष म्हणजे हे प्रकरण आता ईडीच्या कार्यालयात जाऊन पोहोचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल अंबानी यांची ९ तास चौकशी

ईडीने सोमवारी अनिल अंबानी यांची ९ तास चौकशी केली. तर टीना अंबानी चौकशीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून ईडी कार्यालयात आहेत. परकीय चलनाशी संबंधित कायद्यांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी ईडी अंबानी दाम्पत्याची चौकशी करीत आहे. रिलायन्सचे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी यांच्या विरोधात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट ( FEMA) च्या अनेक तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचाः Money Mantra : ‘या’ ५ इक्विटी एसआयपी फंडांनी ३० टक्क्यांपर्यंत दिला परतावा; यादीत निप्पॉन, एचडीएफसीचाही समावेश

हेही वाचाः हे आहेत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप ५ सीईओ, जाणून घ्या त्यांना पगार किती?

८१४ कोटींचे फसवणूक प्रकरण

ईडी ज्या प्रकरणात अंबानी दाम्पत्याची चौकशी करत आहे, तो ८१४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. स्विस बँकेच्या दोन खात्यांमधून या पैशांची अफरातफर झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी अंबानी कुटुंबाला या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. खरं तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्राप्तिकर विभागाने स्विस बँकेतील दोन खात्यांमध्ये ८१४ कोटी रुपयांहून अधिकची अज्ञात रक्कम शोधून काढली होती. यामध्ये ४२० कोटी रुपयांची कथित करचोरी आढळून आली. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने अनिल अंबानी यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अंबानी कुटुंबाला अंतरिम दिलासा दिला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After anil ambani now tina ambani is also being questioned by ed vrd