इन्फोसिस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे आणि तिचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेले विधान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे, असं नारायण मूर्तींचे म्हणणे आहे. दुसरीकडे जगातील ५ मोठ्या कंपन्यांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचा समावेश आहे, त्याचे संस्थापक बिल गेट्स म्हणतात की, आठवड्यातून फक्त ३ दिवस काम केले पाहिजे. दोन प्रभावशाली आणि यशस्वी लोकांची मते एकमेकांच्या परस्पर विरोधी आहेत. या दोघांचे बोलणे ऐकून कोणाचेही डोके चक्रावू जाऊ शकते. साहजिकच कर्मचारी बिल गेट्स यांच्याच विधानाला महत्त्व देतील. अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक विधान केले आहे, त्याचीसुद्धा आता जोरदार चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः १०, २०, ५० लाख रुपये नव्हे, तर ‘या’ व्यक्तीने लग्नात खर्च केले ५०० कोटी

नारायण मूर्ती आणि बिल गेट्स या दोघांनी एकत्र बसावे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. दोघांनीही एका गोष्टीत तडजोड केली पाहिजे. थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे, अशा परिस्थितीत बिल गेट्स आणि नारायण मूर्ती यांनी एकत्र बसून एका गोष्टीवर सहमती दाखवावी. असे झाले तर आज आपण ज्या (कार्यसंस्कृती) पाळत आहोत, म्हणजेच ५ दिवसांचा कामकाजाचा आठवडा यावर नक्कीच एकमत होऊ शकेल.”

हेही वाचाः December 2023 Bank Holidays : वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही भरपूर सुट्ट्या, १८ दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

वर्क कल्चरवर बिल गेट्स काय म्हणाले?

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान या विषयावर चर्चा केली. ते म्हणाले की, जग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कडे वाटचाल करीत आहे. AI च्या मदतीने आम्ही काम सोपे केले पाहिजे आणि ३ दिवसांचा आठवडा सेट केला पाहिजे. कामापेक्षा आयुष्य मोठे आहे आणि ते मोठे असले पाहिजे. हे विधान इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्तींच्या विधानाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, ज्यात त्यांनी तरुणांना भारताच्या प्रगतीसाठी आठवड्यातून किमान ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जपाननेही असेच केले होते, असे नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. भारताचीही झपाट्याने प्रगती करायची असेल तर तरुणांनी जास्त तास काम केले पाहिजे.

७० तास काम करण्यावर टीका होत होती

नारायण मूर्ती यांच्यावर ७० तासांच्या कामकाजाच्या आठवड्यावरही बरीच टीका झाली होती. विशेषत: कष्टकरी तरुणांनी एक्सवर जोरदारपणे आपले मत व्यक्त केले आणि असे झाले तर काम-जीवनाचा समतोल पूर्णपणे बिघडेल असे सांगितले. या मुद्द्यावर काही मान्यवरांनी नारायण मूर्ती यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली.

शशी थरूर यांच्या ट्विटमुळे जुन्या वादाला फोडणी

गेल्या काही दिवसांपासून भारतात हा मुद्दा बराच शांत होता. काँग्रेस नेत्याने ट्विट केले आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. एका युजरने गंमतीने एलॉन मस्कचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “हा हा, जर एलॉन मस्क या चर्चेत सामील झाले, तर आठवड्यातील सरासरी कामाचा कालावधी १० दिवस असेल.”

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After narayana murthy and bill gates shashi tharoor jumped into the debate on working hours vrd
Show comments