गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता, मात्र आता उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडिया(Social Media)वर पाहायला मिळत आहे. या बनावट व्हिडीओमध्ये संशयास्पद व्यक्तींना ऑनलाइन सट्टेबाजीत अडकवले जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रतन टाटा ऑनलाइन सट्टेबाजी प्रशिक्षकाचे समर्थन करताना दिसत आहेत. तसेच लोकांना आमिर खान नावाच्या व्यक्तीचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यास सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीपफेक व्हिडीओमध्ये रतन टाटा काय बोलताना दिसले?

रिपोर्टनुसार, या बनावट व्हिडीओमध्ये दिग्गज भारतीय अब्जाधीश रतन टाटा असे बोलताना दाखवण्यात आले आहेत की, ‘लोक मला नेहमी विचारतात की, श्रीमंत कसे व्हायचे आणि मला तुम्हाला माझा मित्र आमीर खानबद्दल सांगायचे आहे. भारतातही अनेकांनी चांगलं एव्हिएटर गेम खेळून लाखोंची कमाई केली आहे. त्यांचे प्रोग्रामर, विश्लेषक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ChatGPT यांना धन्यवाद, जिंकण्याची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचाः आरबीआयने BOB, IOB आणि सिटी बँक यांना ठोठावला कोट्यवधींचा दंड; PNB अन् AXIS वरसुद्धा कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम?

रतन टाटा यांच्या व्हिडीओचे सत्य

रतन टाटा यांचा वापर करून आर्थिक फसवणूक आणि घोटाळे करण्यासाठी डीपफेक व्हिडीओचा कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो हे दाखवलं जातंय. इंडिया टुडे फॅक्ट चेकनुसार, आमीर खान एक घोटाळेबाज आहे, जो @aviator_ultrawin नावाने टेलिग्राम चॅनेल चालवतो. ‘एव्हिएटर’ बेटिंग गेम खेळून लोक दररोज किमान एक लाख रुपये कमावू शकतात, असा दावा तो त्याच्या चॅनलवर करतो. गेम खेळण्यासाठी तो युजर्सना “एव्हिएटर” वर नोंदणी करण्यास सांगतो.

हेही वाचाः टाटांच्या टेक कंपनीला गुंतवणूकदारांचं भरभरून प्रेम, १ लाख कोटींहून अधिकच्या बोली

हे काम करताना फसवणूक होण्याचा धोका

इंडिया टुडे फॅक्ट चेकनुसार, “एव्हिएटर” गेम नोंदणीसाठी एक लिंक प्रदान केली गेली आहे, त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही इतर वेबसाइटवर पोहोचता. येथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेलसह नोंदणी करण्यास सांगितले जाते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे, जी स्कॅमर्स डेटा मिळविण्यासाठी वापरली जाते.फेसबुक पेजवर रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडीओ किमान पाच वेळा पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नियमित पोस्ट म्हणून दिसत नाही. डीपफेक व्हिडीओ रतन टाटा यांनी एचईसी पॅरिस बिझनेस स्कूलमध्ये मानद पदवी प्राप्त करतानाचा डॉक्टर केलेला व्हिडीओ असल्याचे दिसते.

ऑनलाइन बेटिंग गेमबाबत कोणताही कायदा नाही

भारतातील गेमिंग कायदे सध्या प्रवाहात आहेत आणि ऑनलाइन सट्टेबाजी खेळांचे नियमन करण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा नाही. मागील वर्षी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सट्टेबाजीच्या जाहिरातींबाबत एक सल्लागार जारी केला होता, ज्यामुळे युजर्सना होणाऱ्या आर्थिक जोखमींमुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीला चालना देऊ नये असा सल्ला दिला होता. रश्मिका मंदाना आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त काजोल देवगण आणि इतरांचे अनेक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडिया वेबसाइटवर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rashmika mandana and katrina kaif now ratan tata deepfake video is viral vrd