Tata Steel Cuts 38 Employees : टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी TCS ने गेल्या काही दिवसांपूर्वीच लाचखोरी प्रकरणात सहा अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता टाटा स्टील कंपनीनेही ३८ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण टाटांच्या कंपनीत काम करणे हे सरकारी नोकरीसारखेच मानले जात होते. ज्यामध्ये आधी कधी लोकांच्या नोकऱ्या जात नव्हत्या. मात्र कंपनीने मोठे बदल करताना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे.

टाटा स्टील आणि टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणतात की, टाटा स्टीलने ज्या ३८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यातील ३ कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होते. या कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. चौकशीनंतर या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक टाटा समूहाने अलीकडेच अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे इतर अनेक कंपन्यांचे कर्मचारीही टाटा समूहाचा भाग बनले आहेत. त्यामुळेच आता टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू केली आहे.

कंपनीने ३८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यापैकी ३५ कर्मचाऱ्यांना कंपनीचे नियम न पाळल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले आहे, तर ३ कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांविरुद्ध अधिकारांचा गैरवापर, हितसंबंधांचा फायदा आणि करार व्यवस्थापन करारांचे पालन न करणे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करून टाटा स्टीलने कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, असंही टाटा स्टील आणि टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणालेत.

हेही वाचाः मोठी बातमी! मोदी सरकार बीपीसीएलला विकून १८ हजार कोटी रुपये जमवणार

अशा तक्रारी वाढत गेल्या

कंपनीने गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे आणि खुली संस्कृती आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. कर्मचारी मोकळेपणाने बोलू शकतात, लैंगिक छळापासून ते कंपनीतील नियमांचे उल्लंघन न करण्याबाबत बोलू शकतात. आम्ही लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ८७५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १५८ व्हिसल ब्लोअरशी संबंधित, ४८ सुरक्षेशी संबंधित आणि ६६९ एचआर आणि आचरण तक्रारींशी संबंधित होत्या, असंही टाटा स्टीलच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत चंद्रशेखरन म्हणाले.

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ८ जबरदस्त योजना तुमच्याकडे आहेत? १०० टक्के सुरक्षिततेसह हमी परताव्याची खात्री अन् बरेच फायदे

Story img Loader