चलनातून २ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यापासून आरबीआय आता १ हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १ हजार रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणणार नसल्याचं सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. परंतु सध्या RBI कडून १ हजार रुपयांची नोट चलनात आणण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया १ हजार रुपयांच्या नोटा जारी करणार नाही. चलनातून २ हजार रुपयांची नोट काढून घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेचा १ हजार रुपयांची नोट जारी करण्याचा कोणताही विचार नाही, असंही आरबीआयनं सांगितलंय. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्या सर्वांना ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करण्यास सांगण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, २ हजार रुपयांच्या जवळपास सर्वच नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. १० हजार कोटी रुपयांच्या केवळ २ हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झालेल्या नाहीत. उर्वरित नोटाही बँकांमध्ये परत येत आहेत. त्यासाठी आता काही ठिकाणी २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँक छोट्या मूल्याच्या म्हणजेच १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा बाजारात आणू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र यानंतर या अटकळांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.

हेही वाचाः …म्हणून सोन्याचे भाव चार महिन्यांच्या उच्चांकावर; १० ग्रॅमची किंमत किती?

रुपयाच्या स्थिरतेवर आरबीआयचा भर

आज दिल्लीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारताची आर्थिक स्थिरता, कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयातील अस्थिरता याविषयी चिंता व्यक्त केली. तसेच जागतिक आर्थिक चढउतारांदरम्यान रुपयाच्या स्थिरतेवर भर दिला.

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, दर महिन्याला मोठं उत्पन्न मिळणार; नेमके कोणते फायदे होणार?

यूएसमध्ये बाँडचे उत्पन्न सर्वकाळ उच्च

आरबीआय गव्हर्नरने सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर गुंतागुंतीवर प्रकाश टाकला आहे. डॉलर निर्देशांक बऱ्यापैकी मजबूत झाला आहे. अमेरिकेतील बाँडचे उत्पन्न सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे, परंतु या वर्षी १ जानेवारीपासून भारतीय रुपयाची अस्थिरता पाहायला गेल्यास रुपया ०.६ टक्क्यांनी घसरला आहे, तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरमध्ये याच कालावधीत १० टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. RBI गव्हर्नरने भारताच्या आर्थिक क्षेत्राच्या ताकदीचा पुनरुच्चार केला आहे. तसेच गेल्या पंधरवड्यात नवीन अनिश्चितता आणि कच्चे तेल आणि रोखे बाजारातील अस्थिरता असूनही, भारताच्या आर्थिक मूलभूत गोष्टी मजबूत आहेत. त्यांनी विशेषतः किरकोळ महागाई व्यवस्थापित करण्यासाठी आरबीआयची दक्षता अधोरेखित केली. केंद्रीय बँक १ हजार रुपयांचे मूल्य पुन्हा सुरू करण्याचा विचार करत नसल्याचेही सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the demonetisation of 2000 note now rbi big decision regarding rs 1000 note vrd
Show comments