सतत नोकर कपातीच्या बातम्या येत असल्याने जगभरातील कर्मचारी सध्या भीतीच्या छायेत जगत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाने विमान वाहतूक क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. टाटा समूहाच्या मालकीची कमी किमतीची एअर इंडिया एक्सप्रेस लवकरच ३५० पायलट नियुक्त करणार आहे. हे वैमानिक सध्या प्रशिक्षण घेत आहेत. या हालचालीमुळे एअरलाइनमधील वैमानिकांची संख्या सध्याच्या ४०० वरून जवळपास ८०० पर्यंत दुप्पट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नियुक्त्या अशा वेळी करण्यात आल्या आहेत, जेव्हा विमान उद्योग पायलटच्या कमतरतेच्या बाबतीत सर्वात वाईट संकटातून जात आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले की, पुढील एका वर्षात पायलट पूल ४०० वरून ८००-९०० पर्यंत दुप्पट करण्याच्या एअरलाइनच्या योजनेचा हा एक भाग आहे.

हेही वाचाः अदाणी समूहाकडून नव्या कंपनीची स्थापना, मुख्यालय गांधीनगरमध्ये असणार; व्यवसाय काय? जाणून घ्या

पुढील वर्षाच्या अखेरीस दर ६ दिवसांनी एक विमान ताफ्यात सामील होणार

एअर इंडिया ग्रुपमध्ये समाविष्ट असलेल्या ४ एअरलाइन्स, एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस, एअरएशिया इंडिया आतापासून २०२४ च्या शेवटपर्यंत दर ६ दिवसांनी नवीन विमानाची डिलिव्हरी घेण्यास तयार आहेत. यासह नवीन विमानांची किमान संख्या ७० वर पोहोचेल. साधारणपणे एका विमानाला १५-१६ पायलट लागतात.

हेही वाचाः Money Mantra : सोन्याचा भाव कसा ठरवला जातो? त्याचा इतिहास जाणून घ्या

AirAsia India चे विलीनीकरण करण्याची तयारी

एअर इंडिया एक्सप्रेस ही कमी किमतीची देशांतर्गत विमान कंपनीमध्ये लवकरच AirAsia India विलीन होण्याची शक्यता आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले. टाटा समूहही आपल्या विमान व्यवसायाचे एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेत आहे. या अंतर्गत टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्समध्ये ५१:४९ शेअर्स असलेली विस्तारादेखील एआय इंडियामध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai express air india express announced good news during the period of layoffs 350 pilots will be appointed soon vrd