टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया येत्या काळात १००० हून अधिक पदांसाठी नवीन भरती करणार आहे. आपले बाजारमूल्य वाढवण्यासाठी कंपनी पायलट आणि प्रशिक्षक यांसारख्या पदांवर १००० हून अधिक जणांना नोकरीची संधी देणार आहे. एअर इंडियाकडे सध्या १,८०० पेक्षा जास्त पायलट आहेत. एअरलाइन्सने बोईंग आणि एअरबससह ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे.
नवीन विमाने लवकरच ताफ्यात सामील होणार
नवीन एअरबस फर्म ऑर्डरमध्ये A320/321neo/XLR विमानांची संख्या २१० आहे. दुसरीकडे A350-900/1000 विमानांची संख्या ४० ठेवण्यात आली आहे. बोईंग फर्मच्या ऑर्डरमध्ये 737-MAX विमानांची संख्या १९०, ७८७ विमानांची संख्या २० आणि ७७७ मधील विमानांची संख्या १० असणार आहे.
१०००हून अधिक पदांसाठी पायलटची भरती
कंपनीने गुरुवारी नवीन भरतीबाबत माहिती दिली. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर एअरलाइन १०००हून अधिक पदांसाठी पायलटची भरती करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने सांगितले की, “आम्ही पायलट, फर्स्ट ऑफिसर्स तसेच ट्रेनर्सच्या भरतीची ऑफर देत आहोत. नवीन विमानं A320, B777, B787 आणि B737 या प्रकारात घेतली जात आहेत. यामध्ये १०० हून अधिक विमानांचा समावेश होणार आहे. अलीकडेच एअर इंडियाच्या वैमानिकांनी त्यांच्या पगाराच्या संरचनेत आणि सेवेच्या परिस्थितीत बदल करण्याबाबत एअरलाइनच्या ताज्या निर्णयावर चिंता व्यक्त केली. खरे तर १७ एप्रिल रोजी एअर इंडियाने केबिन क्रूसाठी सुधारित नुकसानभरपाई संरचना सादर केली होती, जी दोन वैमानिक संघटना युनियन्स – इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट्स गिल्ड (IPG) ने नाकारली होती.
हेही वाचाः Layoff 2023: आर्थिक मंदीची चाहूल! आता ‘या’ कंपनीने ८५०० हजार कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी!
टाटा समूह विमान कंपनीचे विलीनीकरण करणार
एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एआयएक्स कनेक्ट आणि विस्तारा या चार एअरलाइन्स टाटा समूहाच्या अंतर्गत काम करतात. टाटा समूह एअर इंडिया एक्सप्रेस, एआयएक्स कनेक्ट विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे. याशिवाय विस्तारा आणि एअर इंडियाचेही विलीनीकरण केले जात आहे.