एकेकाळी जगात भारताची ओळख मानली जाणारी ‘एअर इंडिया’ पुन्हा एकदा अशी कामगिरी करण्यास सज्ज झाली आहे. एअर इंडियाचे टाटा समूहाकडे पुनरागमन झाल्याने त्यांचे दिवस पालटू लागले आहेत. टाटा समूहाचे संपूर्ण लक्ष एअर इंडियाला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे. या दिशेने एअर इंडिया फ्रान्स आणि जर्मनीच्या सर्वात मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांसोबत मोठा करार करणार आहे.

खरं तर टाटा समूहाने एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) खरेदी करण्यासाठी जर्मनीच्या लुफ्थांसा आणि फ्रान्सच्या एअर फ्रान्स केएलएम एअरलाइन्सशी करार केला आहे. टाटा समूहाची इच्छा आहे की, जेव्हा जेव्हा AIESL चा लिलाव होईल, तेव्हा या दोन विमान कंपन्यांची देखभाल उपकंपनी त्या कंसोर्टियमचा एक भाग असावी. टाटा समूहाने आधीच विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या दोन एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सिंगापूर एअरलाइन्सचीही एअर इंडियामध्ये २५.१ टक्के भागीदारी आहे. सिंगापूर एअरलाइन्सची अभियांत्रिकी उपकंपनीही एआयईएसएलच्या लिलावात सहभागी होणाऱ्या कन्सोर्टियममध्ये सहभागी होणार आहे.

iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Volkswagen german factory marathi news
विश्लेषण: जर्मनीतील फोक्सवागेन कार कंपनीचा कारखाना बंद होणार? आर्थिक मंदीची लक्षणे?
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
record demand for ganesh idols from pen in abroad
विश्लेषण : पेणच्या गणेशमूर्तींना यंदा परदेशातून विक्रमी मागणी… कारणे काय? आव्हाने कोणती?
typhoon yagi hits vietnam close airport
चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये विमानतळे बंद करण्याचे आदेश
Will the quality of vistara services remain after merger with Air India
‘विस्तारा’च्या विलीनीकरणामुळे काय होणार? प्रवासी सेवेवर ‘एअर इंडिया’ची छाप पडेल का?
Old Documents found in Tamilnadu
२०० वर्ष जुना स्टॅम्प पेपर, ईस्ट इंडिया, जातीव्यवस्था आणि महिला; तत्कालीन समाजाची नेमकी कोणती माहिती मिळते?

सरकारने AIESLला विकले नाही

१८,००० कोटी रुपयांच्या करारात सरकारने जेव्हा एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवली, तेव्हा त्याची देखभाल दुरुस्ती आणि ऑपरेशन (MRO) उपकंपनी AIESL ला या करारातून बाहेर ठेवण्यात आले, म्हणजेच ती विकली गेली नाही. ती अजूनही सरकारी कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने फक्त एअर इंडियाच्या विमानांचीच दुरुस्ती करते, त्यामुळे एअर इंडियासाठी त्यावर मालकी असणे आवश्यक आहे.

हेही वाचाः देशाच्या प्रगतीला बाधा पोहोचणार, भारतातील ९० टक्के भाग ‘डेंजर झोन’मध्ये

सर्वात मोठी विमान देखभाल कंपनी

AIESL ही देशातील सर्वात मोठी MRO कंपनी आहे. त्यांचे देशभरात ६ हँगर आहेत, जिथे विमानांची देखभाल केली जाते. AIESL ने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४५० विमाने हाताळली. त्यानंतर ८४० कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. सरकार लवकरच खासगीकरणाच्या मार्गावर जाऊ शकते. या संभाव्य करारामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना भारतात त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. दुसरीकडे एअर इंडियाला जागतिक स्तरावर एमआरओ सुविधेचा लाभ घेणे सोपे होणार आहे. एवढेच नाही तर भारताला आंतरराष्ट्रीय हब बनविण्याच्या दिशेने काम करण्यासाठी सरकार एअर इंडिया आणि इंडिगो यांसारख्या विमान कंपन्यांशी चर्चा करीत आहे. असे झाल्यास जगभरातील विमाने भारतात थांबू लागतील, ज्यामध्ये एअर इंडिया आणि AIESL चा चांगलीच प्रगती होईल.

हेही वाचाः केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्वांटम मिशनला दिली मंजुरी, वैज्ञानिक- औद्योगिक संशोधन आणि विकासासाठी ६,००० कोटी खर्च होणार

जगातील सर्वात मोठ्या विमानाची ऑर्डर दिली

एअर इंडिया विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक आघाडीवर बनण्याच्या दिशेने टाटा समूहाने नवीन विमानांची ऑर्डर देऊन आणखी एक मोठे काम केले आहे. कंपनीने बोईंग आणि एअरबसला एकूण ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. या कराराचा आकार सुमारे ७० अब्ज डॉलर आहे. आतापर्यंतची ही जगातील सर्वात मोठी विमान ऑर्डर आहे.