Indigo Fuel Charge Cut: येत्या काही दिवसांत विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने हवाई इंधनाच्या किमती कमी केल्यानंतर इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएफच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर इंडिगोने ऑक्टोबर २०२३ मध्ये इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या, त्याचा फायदा इंडिगोने हवाई प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वस्त विमान प्रवासाचे आश्वासन

इंधन शुल्क कमी करण्याच्या निर्णयावर इंडिगोने सांगितले की, एटीएफच्या किमती सतत बदलणाऱ्या आहेत आणि आम्ही आमचेसुद्धा त्यानुसारच बदल राहू. इंडिगोने म्हटले आहे की, एअरलाइन आपल्या ग्राहकांना परवडणारी, वेळेवर, विनम्र आणि त्रासमुक्त प्रवास देण्याच्या आपल्या वचनाशी कटिबद्ध आहे.

हेही वाचाः ‘या’ भारतीय टेक कंपनीच्या सीईओने रचला नवा विक्रम, बनला नवीन वर्षातील पहिला अब्जाधीश!

ऑक्टोबर २०२३ मध्ये इंधन शुल्क लागू करण्यात आले

हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर इंडिगोने ऑक्टोबर २०२३ मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर ३०० ते १ हजार रुपयांपर्यंत इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १ जानेवारी २०२४ पासून हवाई इंधनाच्या किमती ४ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंडिगोने इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

हेही वाचाः इस्रो आणि एलॉन मस्क पहिल्यांदाच एकत्र, अवकाशात रचणार इतिहास; जाणून घ्या काय आहे मिशन?

एअरलाइन्स त्यांच्या खर्चापैकी ४० टक्के हवाई इंधनावर खर्च करतात

एअरलाइन्सच्या ऑपरेटिंग खर्चात हवाई इंधनाचा वाटा ४० टक्के आहे. हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर विमान कंपन्यांचा खर्च वाढतो आणि त्यानंतर त्याचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागतो. मात्र कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या सलग तीन महिन्यांच्या हवाई इंधनाच्या किमतींचा आढावा घेताना तेल कंपन्यांनी किमती कमी केल्या, त्यामुळे इंडिगोने इंधन शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे.