मुंबई : वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रातील ऐरॉक्स टेक्नॉलॉजीने ७५० कोटी रुपयांची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजना गुंडाळत असल्याचे नुकतेच जाहीर केले. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२२ ला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे दाखल करण्यात आलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, कंपनीचे प्रवर्तक संजय भरतकुमार जयस्वाल आणि आशिमा संजय जयस्वाल हे कंपनीतील त्यांच्या हिश्शाची आंशिक विक्री या माध्यमातून करणार होते. ऐरॉक्स टेक्नॉलॉजीकडून ‘आयपीओ’ मागे घेण्याबाबत कोणत्याही कारणांचा ‘सेबी’कडे खुलासा केलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 8 March 2023: लग्नसराईत सोनं महागणार? वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

२८ फेब्रुवारीला आयपीओची योजना गुंडाळत असल्याचे कंपनीने ‘सेबी’ला कळविले. औरंगाबाद येथील ऐरॉक्स टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन जनरेटर बनवते. आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन जनरेटरचा पुरवठा करण्यामध्ये कंपनीचा ५० ते ५५ टक्के बाजार हिस्सा राहिला होता. कंपनीने मार्च २०२२ पर्यंत एकंदर ८७२ प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन ऑक्सिजन जनरेटर बसविले आहेत. पीएसए ऑक्सिजन जनरेटर हे हवेतून नायट्रोजन वायू वेगळा काढून टाकून शुद्ध ऑक्सिजन तयार करते. हे उपकरण इतर पारंपरिक वैद्यकीय ऑक्सिजन मिळवण्याच्या पद्धतींपेक्षा कमी खर्चात ऑक्सिजन तयार करते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airox technologies scraps 750 crore ipo plan zws
Show comments