Akshay Tritiya 2023 What to buy:अक्षय तृतीयेचा मुहूर्त जवळ येत असून, या दिवशी घरात नक्कीच काहीतरी नवीन खरेदी केले जाते हे तुम्ही पाहिलेच असेल. भारतात दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यावेळी तो मुहूर्त २२ एप्रिल २०२३ रोजी आला आहे. दरवर्षी या दिवशी लोक छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठाही सजलेल्या असतात आणि तुम्हाला अनेक ऑफर्सही मिळतात. विशेषत: या दिवशी सोन्याची मोठी खरेदी होते.

अक्षय्य तृतीयेलाच काहीतरी खरेदी का करायचे?

अक्षय म्हणजे कधीही न संपणारी आणि तृतीया म्हणजे तिसरी. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला काही शुभ गुंतवणूक करतो, त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेलादेखील मानले जाते. या दिवशी लोक भांडी, सोने-चांदी आणि इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. असे मानले जाते की, या दिवशी एखादी वस्तू खरेदी केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुम्हाला समृद्धी मिळते. यामागे अनेक धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे आहेत.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती

अक्षय्य तृतीयेला तुम्ही काय खरेदी करू शकता?

जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करत नसाल किंवा कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर अक्षय्य तृतीया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अशी काही गुंतवणूक माध्यमे आहेत, जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता.

सोने ही ग्राहकांची पहिली पसंती आहे

अक्षय्य तृतीयेला सोन्याची सर्वाधिक खरेदी होते. आपण सोन्याला संपत्ती आणि समृद्धीशी जोडून पाहत आलो आहोत. भारतीयांना सोन्यात गुंतवणूक करण्याची सवय आहे, त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. या दिवशी तुम्ही सोन्यातही गुंतवणूक करू शकता. सोन्याची नाणी, विटा, दागिने तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खरेदी करू शकता आणि आता डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा पर्यायही उपलब्ध आहे.

बजेटमध्ये चांदीही खरेदी करू शकता

चांदीलाही भारतात शुभ धातू मानले जाते. कोणत्याही शुभ प्रसंगी चांदीची खरेदी केली जाते आणि भेट दिली जाते. काही लोक देवाला मंदिरात चांदीची नाणी किंवा दागिनेही अर्पण करतात. सोन्यापेक्षा चांदीही स्वस्त आहे, त्यामुळे अक्षय्य तृतीयेला कमी बजेटमध्येही खरेदी करून तुम्ही शुभ मुहूर्ताचा फायदा घेऊ शकता.

हेही वाचाः मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचा नवा विक्रम; गेल्या ९ वर्षांत १७ कोटी ग्राहकांनी घेतले नवे गॅस कनेक्शन

हिऱ्यांमध्येही गुंतवणूक करणे सोपे

सोने आणि चांदीच्या तुलनेत हिरा थोडा महाग धातू आहे आणि लोक फक्त काही खास प्रसंगी हिरे खरेदी करतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही हिऱ्यांमध्येही गुंतवणूक करू शकता. याशिवाय इतर काही स्टोन्स खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला स्वतःसाठी नीलम, माणिक, पन्ना, मोती खरेदी करायचा असेल तर तुम्ही या दिवशी ते खरेदी करू शकता.

हेही वाचाः देशातील आघाडीची आयटी कंपनी आता विकणार पीठ, तांदूळ, डाळ; अंबानी-अदाणींच्या कंपन्यांशी स्पर्धा करणार

मालमत्ता आणि रिअल इस्टेटची खरेदी

जर तुम्हाला मालमत्ता किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता. घर किंवा जमीन खरेदी करण्यासारखी मोठी गुंतवणूक देखील या दिवशी खूप शुभ मानली जाते. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे ही एक मोठी गोष्ट आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आधी जमीन आणि इतर तपशील तपासा.

तुमच्यासाठी गुंतवणुकीचे इतरही पर्याय

समजा तुम्हाला वर नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टीत गुंतवणूक करायची नसेल, तरीही तुमच्यासाठी असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही या दिवशी पैसे गुंतवू शकता. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि अशी अनेक आर्थिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. असे मानले जाते की, या दिवशी केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परिणाम देते, म्हणून तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. पण बाजार आणि अशा इतर घटकांशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

Story img Loader