Baba Ramdev Patanjali Legal Notice : आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजली या कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचंही तक्रारदाराचं म्हणणं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वकील शाशा जैन यांनी पतंजलीला आपल्या शाकाहारी उत्पादनात मांसाहाराचा वापर केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्विटरवर चिंता व्यक्त करत शाशा लिहितात की, कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये शाकाहारी घटकांचा वापर करण्याचा दावा करते, परंतु त्यांच्या दिव्या दंत मंजन टूथपेस्टमध्ये सी फेन (कटलफिश) वापरण्यात आले आहे. त्यामुळे मी कायदेशीर नोटिशीद्वारे कंपनीकडून स्पष्टीकरणही मागितले आहे.

ट्विटरवर पोस्ट केल्याने यूजर्स संतापले

शाशा जैन यांनीही आपले आरोप आणि कायदेशीर नोटीस ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्या लिहितात, पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि त्यांच्या उत्पादनात दिव्या दंत मंजनच्या सी फेनच्या वापराबद्दल उत्तर मागितले आहे, कंपनी हे उत्पादन ग्रीन लेबलसह विकते. हे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे. याबरोबरच पतंजली उत्पादने वापरणाऱ्या मोठ्या संख्येने शाकाहारी ग्राहकांच्या भावनांशीही ते खेळत आहेत. खरं तर शाशा जैन यांनी कायदेशीर नोटिशीची प्रतही शेअर केली आहे.

जैन लिहितात की, जेव्हा कंपनी आपले उत्पादन शाकाहारी उत्पादन म्हणून बाजारात आणते, तेव्हा त्यात मांसाहारी वस्तू वापरणे हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच उत्पादन लेबलिंग कायद्याचे उल्लंघन आहे. माझे कुटुंब, नातेवाईक, सहकारी आणि मित्र सर्वजण या उत्पादनाचा वापर करतात आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे हे पाऊल असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः ‘या’ बँकांनी मेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटचे दर बदलले, आता तुम्हाला किती फायदा?

कंपनीवर गंभीर आरोप

मी स्वतः पतंजलीची अनेक उत्पादने वापरते. परंतु आता तुमच्या बाजूने स्पष्टीकरण येईपर्यंत, मला या उत्पादनांबद्दल संशय आहे. ११ मे रोजी पाठवलेल्या या नोटिशीमध्ये कंपनीला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत कंपनीने स्पष्टीकरण न दिल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल. वकिलाने ट्विटरवर अपलोड केलेल्या कंपनीच्या उत्पादनात सी फेन (कटलफिश) वापरण्यात आल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे.

हेही वाचाः एअरटेलनं कंबर कसली, ५जी तंत्रज्ञान प्रत्येक शहर आणि गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज!

समुद्र फेन काय आहे?

समुद्रात आढळणारा कटल मासा जेव्हा मरतो, तेव्हा त्याची हाडे पाण्यात विरघळतात आणि पृष्ठभागावर तरंगू लागतात. हे एक पद्धतीचं प्राण्यांपासून बनवलेले उत्पादन आहे. जेव्हा जास्त कटल माशांची हाडे पृष्ठभागावर येतात, तेव्हा ते दुरून फेस किंवा फेनसारखे दिसतात. या कारणास्तव त्याला समुद्र फेन म्हणतात. कधी तरी ते वाहून जाऊन किनाऱ्यावरही येतात. मच्छीमार हा फेन गोळा करून वाळवून विकतात. याचा वापर चित्रकला, शिल्पकला आणि औषधांमध्ये केला जातो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation of non vegetarian ingredients in patanjali toothpaste legal notice sent by complainant vrd