भारतातील अदाणी समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये ओपेक फंडा(अपारदर्शक फंड)च्या माध्यमातून लाखो डॉलर्स गुंतवले गेलेत, ज्यात अदाणी कुटुंबातील कथित व्यावसायिक भागीदारांचा अस्पष्ट सहभाग होता, अशी माहिती आर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP -संघटित गुन्हे आणि भ्रष्टाचार अहवाल प्रकल्प)च्या अहवालात देण्यात आली आहे.

अर्थ कर छावण्या (multiple tax havens)आणि अदाणी ग्रुपच्या अंतर्गत ईमेलच्या फायलींच्या तपासाचा हवाला देत OCCRP ने सांगितले की, त्यांच्या तपासणीत किमान दोन प्रकरणे अशी आढळून आलीत, जिथे गुंतवणूकदारांनी ऑफशोर पद्धतीने अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री केली.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?

यूएस आधारित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारीमध्ये अदाणी ग्रुपच्या शेअर्समधून कमाई करणाऱ्या कंपन्या किंवा संस्थांपैकी तीन भारतातील असल्याचं सांगितलं होतं. तर चार मॉरिशसमध्ये आणि प्रत्येकी एक फ्रान्स, हाँगकाँग, केमन बेटे, आयर्लंड आणि लंडनमधील आहेत. कोणत्याही FPI/FII ने त्यांच्या मालकीची रचना प्राप्तिकर अधिकार्‍यांकडे उघड केलेली नाही.परंतु अदाणी समूहाने हिंडेनबर्गच्या दाव्यांना दिशाभूल करणारे आणि पुराव्याशिवाय केलेले आरोप म्हटले आहे. तसेच ते नेहमी कायद्यांचे पालन करत असल्याचे सांगितले होते.

हेही वाचाः रिलायन्सच्या एजीएममध्ये नीता अंबानींच्या साडीने वेधले सगळ्यांचे लक्ष, भारताच्या पारंपरिक कारागिरीचे अतुलनीय उदाहरण

OCCRP कोण आहे ते जाणून घ्या?

OCCRP ची स्थापना युरोप, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत पसरलेल्या २४ ना नफा तत्त्वावरच्या तपासणी केंद्रांद्वारे केली गेली आहे. वर्ष २००६ मध्ये स्थापित OCCRP संघटित गुन्ह्यांचा अहवाल देण्याच्या कौशल्याचा दावा करते. हे मीडिया हाऊसच्या भागीदारीतून अहवाल आणि लेख प्रकाशित करते. संस्थेच्या वेबसाइटनुसार, जॉर्ज सोरोसच्या युनिट ओपन सोसायटी फाऊंडेशनद्वारे याला निधी दिला जातो. जगभरातील परिवर्तनवादी कल्पनांना पुढे नेण्यासाठी अर्थपुरवठा करण्यात सोरोस आघाडीवर आहेत. फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशन यांचा समावेश असलेल्या इतर संस्थांकडून अनुदान मिळते.

हेही वाचाः मनरेगा कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, आधार पडताळणीची मुदत वाढवली

हिंडेनबर्गच्या अहवालाने दहशत निर्माण केली

यंदा २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधन अहवालात अदाणी समूहावर ऑडिट फसवणूक, शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि करचुकवेगिरीचा अयोग्य वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे समूह कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली होती. मात्र, अदाणी समूहाने सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले होते.

परदेशी निधीचा खुलासा केला जाऊ शकतो

संबंधित कॉर्पोरेट हाऊसच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये परकीय फंडांचा समावेश असल्याचे या खुलाशातून समोर येते, असे सूत्रांनी सांगितले. कॉर्पोरेट हाऊसची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र एजन्सी भांडवली बाजारावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे.