जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांच्या संपत्तीत आता वाढ झाली आहे. यावेळीही एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारतीय अब्जाधीशांबद्दल बोलायचे झाल्यास मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मेटा सीईओ मार्क झुकरबर्गला सर्वात जास्त फायदा झाला आहे. त्यांच्या संपत्तीत ३.७३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जगातील टॉप १० अब्जाधीशांबद्दल जाणून घेऊ यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मस्क-बर्नार्ड यांच्या संपत्तीत किती वाढ?

ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. एलॉन मस्कची एकूण संपत्ती ३९३ दशलक्ष डॉलरने वाढली आहे, आता त्यांची संपत्ती २३९ अब्ज डॉलरइतकी आहे. त्याचवेळी फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २.३१ अब्ज डॉलरने वाढली आहे. आता बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती १६९ अब्ज डॉलर आहे. यानंतर जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २.०१ अब्ज डॉलरने वाढून १५१ अब्ज डॉलर झाली आहे.

हेही वाचाः ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना मोठा इशारा;…तर ३१ ऑक्टोबरनंतर डेबिट कार्ड बंद होणार, पैसे काढता येणार नाहीत

जगातील टॉप १० अब्जाधीश

एलॉन मस्क जगातील टॉप वन अब्जाधीश आहे, तर बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या स्थानावर आणि जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे लॅरी एलिसन चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १२५ अब्ज डॉलर्स आहे. बिल गेट्स जगातील टॉप १० अब्जाधीशांमध्ये सामील आहेत. त्याच्याकडे एकूण १२३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

लॅरी पेजकडे १२३ अब्ज डॉलर्सची संपत्तीदेखील आहे. तो सहाव्या स्थानावर येतो. सातव्या क्रमांकावर सर्जी ब्रिन आणि आठव्या क्रमांकावर वॉरेन बफे आहेत. जगातील अव्वल ९ अब्जाधीशांमध्ये मार्क झुकेरबर्गचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती ११४ अब्ज डॉलर्स आहे. स्टीव्ह बाल्मर टॉप १० मध्ये आहे, त्यांची एकूण संपत्ती ११४ अब्ज डॉलर्स आहे.

हेही वाचाः Money Mantra : PM विश्वकर्मा योजना आरबीआयच्या PIDF मध्ये सामील, मुदत आणखी २ वर्षांसाठी वाढवली, कारागिरांना होणार फायदा

भारतीय अब्जाधीशांची संपत्ती वाढली

जगातील टॉप १० अब्जाधीशांची माहिती समजल्यानंतर जर आपणाला भारतीय अब्जाधीशांबद्दल बोलायचे झाल्यास ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, भारतीय अब्जाधीशांची संपत्तीही वाढली आहे. भारतातील सर्वोच्च कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती १२३ दशलक्ष डॉलरने वाढली आहे. त्यांची एकूण संपत्ती ४०९ दशलक्ष डॉलर आहे. आशियातील श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर गौतम अदाणी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्ग अहवालाने अदाणी यांच्या संपत्तीत जवळपास निम्म्याने घट केली होती. सध्या गौतम अदाणी यांच्या संपत्तीत १७० दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ते १९ व्या क्रमांकावर आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with elon musk wealth mukesh ambani wealth increased know who are the top 10 billionaires in the world vrd
Show comments