ई-कॉमर्स व्यवसायातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनने कॅश ऑन डिलिव्हरीवर २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत अपडेट जारी केले आहे. १९ सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटांची कॅश डिलिव्हरी घेणार नाही. मात्र UPI पेमेंट करता येणार आहे, अशी घोषणा अॅमेझॉन डिलिव्हरी कंपनीने केली आहे. त्यांनी आपल्या FAQ मध्ये लिहिले आहे की, १९ सप्टेंबरपासून ते कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पेमेंट आणि कॅशलोड म्हणून २ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद करतील.
Amazon सध्या २००० रुपयांच्या नोटा स्वीकारत आहे. या नोटा १९ सप्टेंबर रोजी किंवा त्यानंतर होणार्या कोणत्याही वितरणासाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. कंपनीने पुढे सांगितले की, थर्ड पार्टी कुरिअर पार्टनरद्वारे Amazon वरून कोणताही माल डिलिव्हरी केल्यास २००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.
RBI ने २ हजारांच्या नोटा वितरणातून काढण्याची घोषणा कधी केली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट वितरणातून काढून घेण्याची घोषणा केली होती. मात्र, वितरणातून बाहेर पडल्यानंतरही २००० रुपयांची नोट ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता आणि बदलता येणार आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन २ हजार रुपयांची नोट बदलू शकता.
RBI कडे २ हजारांच्या किती नोटा आल्या?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २० दिवसांच्या आत चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ५० टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी २५ मे रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी पैसे काढण्याची घोषणा केल्यानंतर ३० जूनपर्यंत भारतीय बँकांना २.७२ ट्रिलियन रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा मिळाल्या. जुलैपर्यंत ७६ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या होत्या.
९३ टक्के नोटा परत आल्या
आरबीआयने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या ९३ टक्के चलनी नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. फक्त ७ टक्के बाजारात उपलब्ध असून, चलनात आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, ज्यांनी अद्याप २ हजार रुपयांची नोट जमा केली नाही किंवा बदलली नाही ते बँकेच्या शाखेत जाऊन बदलू शकतात.