Cake Designer Prachi Dhabal Deb : बऱ्याचदा आपण नोकरी किंवा धंदा करतो, पण आपलं मन त्यात रमत नाही. तुमच्या आतला ‘कलाकार’ तुम्हाला वारंवार या गोष्टींची जाणीव करून देत असतो. परंतु त्यातील काही जण आतला आवाज ऐकतात, असाच काहीसा प्रकार पुण्याच्या प्राची धबल देबसोबत घडला आहे. पेशाने व्यावसायिक विश्लेषक असलेल्या प्राचीला बेकिंगची आवड होती आणि ती या कलेमध्ये पारंगत झाली. विशेष म्हणजे ती सामान्य केक बेकर न बनता ती ‘केक आर्टिस्ट’ बनली, जी ‘पॅलेसेस’च्या आकारासारखे प्रचंड केक बनवते आणि लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. फोर्ब्ससारख्या प्रतिष्ठित मासिकानेही प्राची धबल देबला ‘गेम चेंजर्स ऑफ मॉडर्न इंडिया’मध्ये स्थान दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील पुणे येथील प्राची धबल देब (३७) हिनेसुद्धा विश्वविक्रम केला असून, तिने २०० किलो वजनाचा केक बनवलाय. लंडन स्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सर्वात मोठा केक म्हणून मान्यता दिली आहे. पुण्यातील कलाकार प्राची धबल देब हिने लंडनस्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिच्या कलाकारीची नोंद केली आहे. जर आपण केकची लांबी, उंची आणि रुंदीबद्दल बोललो तर ते अनुक्रमे १० फूट १ इंच, ४ फूट ७ इंच, ३ फूट ८ इंच आहे. २०० किलोचा केक अत्याधुनिक आणि रंगीबेरंगी आयसिंग कंपोझिशनने सजवण्यात आला आहे.

राजघराण्याचा केक बनवण्यासाठी डिझायनरने पुढाकार घेतला

प्राची धबल देबला तिची कलाकारी सर एडी स्पेन्सपर्यंत घेऊन गेली. एडी स्पेन्सने ७१ वर्षे ब्रिटिश रॉयल फॅमिलीसाठी केक डिझायनर म्हणून काम केले. राणी एलिझाबेथच्या लग्नापासून तिच्या रौप्य महोत्सवापर्यंत एडी स्पेन्सने रॉयल केक डिझाइन केले. प्राची धबल देबनेही त्याच्यासोबत काम करून रॉयल आयसिंग शिकून घेतले आणि आज ती उत्कृष्ट ‘रॉयल ​​आयसिंग’ बनवते.

हेही वाचाः लाखात एक खाट! अमेरिकन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाखो रुपयांत विकली जातेय खाट

व्हेगन रॉयल आयसिंग विकसित केले

प्राची धबल देबनेही तिची कला भारतीय चवीनुसार स्वीकारली आणि साकारली. भारतातील बहुतेक लोकांना ‘एगलेस’ केक खायला आवडतो, म्हणून तिने एगलेस केक बनवायला सुरुवात केली. तिने आयसिंगसाठी स्वतःवर विश्वास ठेवला आणि १०० टक्के व्हेगन रॉयल आयसिंग विकसित केले. प्राची धबल देब हिने भारतात ‘केक डेकोर इंडिया-रॉयल आयसिंग आर्ट’ची स्थापना केली.

हेही वाचाः ‘या’ बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात केली वाढ; आता तुम्हाला इतका परतावा मिळणार

मुघल कलेपासून ते आजच्या डिझाइनपर्यंत पारंगत

प्राची धबल देबची बेकिंग शैली अनेक मुघल कला आणि वास्तुविशारदांकडून प्रेरित आहे. लोकांना तिच्या बेक केलेल्या कुकीज आणि कपकेकवर आधुनिक भरतकाम, पेंटिंग्ज, फुलांची कलाकृती आणि नवीन डिझाइन्स पाहायला मिळतात. केक मास्टर अवॉर्डचा रॉयल आयसिंग अवॉर्ड २०१९, २०१७ आणि २०१८ मध्ये भारतातील टॉप १० केक आर्टिस्ट, असे अनेक पुरस्कार तिच्या खात्यात आहेत. याशिवाय ती ग्लोबल शुगर आर्टिस्ट नेटवर्कमध्ये जजही राहिली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analyst to become a cake artist talent brought international recognition to a girl from maharashtra vrd