अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आतापर्यंत २३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्याज परतावा देण्यात आला आहे. यापुढे लाभार्थ्यांनी व्याज परताव्याचा दावा केल्यानंतर सात दिवसांच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्याकरिता महामंडळांनी कार्यपद्धतीचे कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाविषयी आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचाः दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारने महागाई भत्त्यात केली ४ टक्क्यांची वाढ

मंत्री पाटील म्हणाले की, १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंतचे व्याज परताव्यासाठी दाखल झालेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आतापर्यंत ५५४ कोटींपेक्षा अधिक व्याज परतावा अर्थसहाय्य मराठा समाजाकरिता देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत महामंडळाकडे व्याज परताव्याचे एकही प्रकरण प्रलंबित नाहीत. आज सकाळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ६ हजार लाभार्थ्यांना ४.६५ कोटी रुपयांचा व्याज परतावा ऑनलाईल स्वरुपात वितरीत करण्यात आला.

हेही वाचाः शुभ मंगल सावधान! दिवाळीनतंर ३५ लाख जोडपी विवाह बंधनात अडकणार, ‘इतक्या’ लाख कोटींपेक्षा जास्त व्यवसाय होण्याची शक्यता

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनांना सर्वोत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनांच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास ७० हजारांपेक्षा जास्त अधिक मराठा उद्योजक तयार झाले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मितीस चालना मिळत आहे. या योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annasaheb patil economically backward development corporation should refund interest to beneficiaries within seven days says chandrakant patil vrd
Show comments