गौतम अदाणी आणि अदाणी समूहाच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आधी शेअर्सची घसरण आणि आता कंपन्यांचा तोटा खूप काही सांगून जात आहे. अमेरिकन मित्र राजीव जैन हे अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने गुंतवणूक करीत असले तरी त्यांचा बाजारावरील प्रभाव सतत कमी होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अदाणी विल्मरच्या व्यवसायात होत असलेला तोटा आहे. खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीमुळे कंपनीच्या उत्पादनांना ग्राहकांकडून असलेली मजबूत मागणी कमी होत चालली आहे. त्यामुळे कंपनीची पहिल्या तिमाहीत विक्री १५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाद्यतेलाची ५० टक्क्यांपर्यंत घसरण

अदाणी समूह आणि सिंगापूरचा विल्मर समूह यांच्या संयुक्त उपक्रमानुसार, विकसित अर्थव्यवस्थेकडून कमी ग्राहकांची मागणी, काळ्या समुद्राच्या प्रदेशात पुरवठ्यात झालेली कपात आणि तेलबियांचे मजबूत उत्पादन यामुळे खाद्यतेलाच्या किमती एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ५० टक्क्यांनी घसरल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे उत्पादनाची मागणी वाढली आहे, ज्यामुळे कंपनीच्या सर्वात मोठ्या विभागातील व्हॉल्यूममध्ये २५ टक्के वाढ झाली आहे, असंही फॉर्च्युन खाद्यतेल निर्मात्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचाः आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ; आता घरबसल्या वापरा ‘ही’ सोपी पद्धत!

त्यांची विक्री ३० टक्क्यांनी वाढली

कंपनीच्या अन्न आणि वेगाने वाढणाऱ्या ग्राहक उत्पादनांच्या विभागातील विक्रीमध्ये साबणापासून तांदूळपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे, त्याच्या मजबूत मागणीमुळे त्यात ३० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. परंतु कंपनीच्या खाद्यतेल आणि उद्योग अत्यावश्यक विभागाच्या एकूण विक्रीत १५ टक्क्यांनी घट झाली आहे, ज्यांचे एकूण विक्री मूल्यानुसार सुमारे ९२ टक्के योगदान आहे. यापूर्वी बुधवारी प्रतिस्पर्धी मॅरिकोने सांगितले की, जून तिमाहीच्या महसुलात घट झाली आहे. कमाईत घसरण मुख्यत्वे ग्रामीण बाजारपेठेतील मंद विक्री आणि सफोला खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने झालीय.

हेही वाचाः Money Mantra : वैयक्तिक कर्जाचे फायदे आणि तोटे काय? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

कंपनीचे शेअर्सही घसरले

यंदाच्या वर्षात आतापर्यंत अदाणी विल्मरचे शेअर्स सुमारे ३४ टक्क्यांनी घसरले आहेत. आज बोलायचे झाल्यास कंपनीचा शेअर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्थिर व्यापार करीत आहे. कंपनीचा शेअर १.५५ रुपयांनी वाढून ४०८.५० रुपयांवर व्यवहार करीत आहे, तर ट्रेडिंग सत्रादरम्यान तो ४१२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर ४०६.९५ रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another blow to adani group first the adani wilmar shares fell now this company suffered a huge loss vrd
Show comments