अदाणी समूहाच्या अडचणी काही थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. समूहावर पुन्हा संकट कोसळले आहे. कारण हिंडेनबर्गच्या अहवालानंतर आता नव्या अहवालाने अदाणी समूहावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्गने अदाणी समूहावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे त्या आरोपांमुळे अदाणींची संपत्ती निम्म्यावर आली होती. तसेच आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच जगातील आघाडीचे गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या OCCRP ने अदाणी समूहाच्या गुंतवणुकीवर गंभीर आरोप केले आहेत. अदाणी कुटुंबाच्या भागीदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘ऑफ शोअर’ म्हणजेच अपारदर्शक निधीचा वापर केला आहे, असा फर्मचा दावा आहेय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

OCCRP च्या अहवालांनुसार, “ओपेक” मॉरिशस फंडाच्या माध्यमातून अदाणी समूहाच्या काही सार्वजनिकपणे व्यापार केलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्स गुंतवले गेले आहेत, ज्याने अदाणी कुटुंबाच्या कथित व्यावसायिक भागीदारांची भागीदारी स्पष्ट केली आहे. मात्र, अदाणी समूहाने ओसीसीआरपीचा अहवाल मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचाः अदाणींच्या शेअर्सबाबत OCCRP च्या अहवालात मोठा गौप्यस्फोट, ‘ओपेक फंड’चा वापर करून…

३ तासांत ३५,००० कोटी रुपयांचे नुकसान

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच OCCRP ने केलेल्या आरोपांनंतर अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली आहे. अदाणी समूहाच्या वतीने आरोप फेटाळल्यानंतरही शेअर्सची विक्री होताना दिसत आहे. दहापैकी सर्व दहा समभाग लाल रंगात व्यवहार करीत आहेत. अदाणी पॉवरचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले, तर अदाणी ट्रान्समिशनचे शेअर्स ३.३ टक्क्यांपर्यंत घसरले. अदाणी एंटरप्रायझेसच्या समभागांच्या किमती २.५० टक्क्यांनी घसरल्या, तर अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी टोटल गॅस प्रत्येकी २.२५ टक्क्यांनी घसरले. अदाणी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांपैकी सर्व १० कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात ३५,६२४ कोटी रुपयांची घसरण झाली. बुधवारच्या व्यवहाराच्या अखेरीस समूहाचे बाजारमूल्य १०,८४,६६८.७३ कोटी रुपये होते, जे आता १०,४९,०४४.७२ कोटी रुपयांवर आले आहे. ३ तासांत ३५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचाः रिलायन्सच्या एजीएममध्ये नीता अंबानींच्या साडीने वेधले सगळ्यांचे लक्ष, भारताच्या पारंपरिक कारागिरीचे अतुलनीय उदाहरण

OCCRP च्या अहवालातील गौप्यस्फोटावर अदाणी समूहाचा खुलासा

अदाणी समूहानं एक निवेदन जारी केले आहे. “हिंडनबर्गच्या बदनाम अहवालाची पुनर्रचना करण्यासाठी परदेशी मीडियाला हाताशी धरून जॉर्ज सोरोस-फंडेड OCCRP द्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसतेय. खरं तर आम्हाला हीच अपेक्षा होती.” विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापूर्वीही माध्यमांनी अशीच भीती व्यक्त केली होती…” अदाणी समूहाने सांगितले की, स्वतंत्र निर्णय घेणारे प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरण या दोघांनीही मूल्यांकन वाढलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि व्यवहार लागू कायद्यांनुसार झाल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another fresh allegation against the adani group sent the company shares crashing loss of rs 35000 crore in 3 hours vrd