पीटीआय, नवी दिल्ली

संकटग्रस्त ‘बैजूज’ने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) नुकत्याच दिलेल्या दिवाळखोरीच्या कार्यवाहीच्या आदेशाला, राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाकडे अर्थात एनसीएलएटीकडे धाव घेत गुरुवारी आव्हान दिले. कंपनीने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली असल्याचे ताज्या घडामोडीच्या माहीतगार सूत्रांनी स्पष्ट केले.

Mallikarjun Kharge and JP Nadda
EC Writes to BJP and Congress : आचारसंहितेचं उल्लंघन! भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच असलेल्या ‘बैजूज’च्या विरोधात मंगळवारी एनसीएलटीकडे दिवाळखोरीसाठी याचिका दाखल केली होती. एनसीएलटीने ती मंजूर करताना, कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्याचे मंगळवारी आदेश दिले. मात्र एनसीएलटीच्या बेंगळूरु खंडपीठाने दिलेल्या आदेशाविरोधात ‘बैजूज’ने आता अपील दाखल केले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील बोधचिन्हासाठी ‘बैजूज’ने प्रायोजकत्व दिले होते. त्या प्रायोजकत्वाचे थकलेले १५८.९ कोटी रुपये देण्यात अपयशी ठरल्याने बीसीसीआयने ‘बैजूज’वर दिवाळखोरीचा दावा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>Video: महिन्याला ३५ लाख कमावणारा २२ वर्षीय तरुण; कोण आहे इशान शर्मा, ज्यानं अशनीर ग्रोवर यांनाही धक्का दिला!

आठवड्याच्या सुरुवातीला ‘बैजूज’ने म्हटले होते की, ती बीसीसीआयसोबत सौहार्दपूर्ण तोडगा काढू इच्छित आहे. दिवाळखोरीच्या कार्यवाहीचा आदेश असूनदेखील या वादावर अजूनही न्यायालयबाह्य तोडगा निघू शकतो. सध्या आमचे वकील याबाबत माहिती घेत असून कंपनीच्या हितरक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलले जातील, असे ‘बैजूज’च्या प्रवक्त्याने सांगितले.

‘बैजूज’ने जून २०२२ मध्ये झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेसाठी २३.३५ कोटी रुपयांच्या फक्त एका देयकाची पूर्तता केली आहे. मात्र त्यानंतरची देणी पूर्ण करण्यास कंपनी अयशस्वी ठरली. दक्षिण आफ्रिकेनंतर, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धची मालिका, आशिया चषक आणि आयसीसी टी-२० मालिका/दौऱ्यांसाठी प्रायोजकत्व शुल्काचा यात समावेश आहे. ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीसाठी एकंदर १५८.९ कोटी रुपये कंपनीने थकविले आहेत.

अलीकडच्या वर्षांत ‘बैजूज’ला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. चालू महिन्यात ‘बैजूज’ने हक्कभाग विक्रीद्वारे उभारलेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे अन्यथा लेखापरीक्षणास सामोरे जावे, असा इशारादेखील एनसीएलटीने दिला होता. याचबरोबर ‘बैजूज’चे परदेशी गुंतवणूकदार आणि संस्थापक रवींद्रन बैजू यांच्या दरम्यान वाद शिगेला पोहोचला असून परदेशी गुंतवणूकदार त्यांची हकालपट्टी करू इच्छित आहेत. ‘बैजूज’चे संस्थापक रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गैरव्यवस्थापन आणि अपयशाचे खापर फोडण्यात येत आहे.