Keven Parekh या बहुचर्चित आणि जगप्रसिद्ध कंपनीच्या सीएफओ (CFO) पदी भारतीय वंशाचे इंजिनिअर केवन पारेख यांची निवड करण्यात आली आहे. लुका मॅस्ट्री यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केवन पारेख ( Keven Parekh ) १ जानेवारी २०२५ पासून टेक कंपनी अॅपलचे सीएफओ अर्थात चीफ फायनांशिअल ऑफिसर म्हणून काम पाहतील.

केवन पारेख सध्या कुठल्या पदावर?

केवन पारेख ( Keven Parekh ) हे अॅपल कंपनीत मागील ११ वर्षांपासून काम करत आहेत. सध्या ते फायनान्शिअल प्लानिंग अँड अॅनालिसिस विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. १ जानेवारी २०२५ पासून ते CFO हे पद सांभाळतील. ११ वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अॅपल या कंपनीत सुरुवातीला केवन पारेख ( Keven Parekh ) यांनी वर्ल्डवाईड सेल, रिटेल आणि मार्केटिंगसाठीही त्यांनी काम पाहिलं.

हे पण वाचा- Apple: पासवर्ड विसरलात अन् फोन झाला लॉक? चिंता सोडा! आता हृदयाच्या ठोक्यांसह करता येईल फोन अनलॉक?

केवन पारेख यांनी कोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत?

५२ वर्षीय केवन पारेख यांनी बिझनेस एज्युकेशन केलं आहे तसंच ते एक उत्तम इंजिनिअर आहेत. मिशिगन विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रील इंजिनिअरची पदवी घेतली आहे. तसंच शिकागो येथील महाविद्यालयातून त्यांनी MBA केलं आहे. अॅपल कंपनीत काम सुरु करण्यापूर्वी पारेख थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोर्टसमध्ये विविध पदांवर काम केलं. त्यांनी थॉमसन रॉयटर्सचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे. तसंच जनरल मोटर्सच्या न्यूयॉर्कच्या ऑफिसमध्ये केवन पारेख ( Keven Parekh ) यांनी बिझनेस डेव्हलपमेंट संचालक म्हणूनही काम केलं आहे. तसंच रिजनल ट्रेझर या पदावरही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- iPhone वापरताय? मग ही चार चिन्हं टाईप करताच फोन होईल क्रॅश; आयफोनमध्ये नवा बग सापडला!

टिम कुकने काय म्हटलं आहे?

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार केवन पारेख यांना मागच्या काही महिन्यांपासूनच CFO या पदासाठी तयार केलं जातं आहे. सध्या केवन पारेख हे कंपनीत फायनान्शिअल प्लानिंग आणि अॅनालिसिसचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांनी मागच्या ११ वर्षांमध्ये विविध पदांवर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कंपनीच्या कामकाजाची त्यांची जाण प्रचंड आहे. त्यामुळे त्यांची सीएफओ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ पासून ते पदभार सांभाळतील.