नवी दिल्ली : जागतिक स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘ॲपल’कडून भारतातील व्यवसायातून चालू वर्षअखेरपर्यंत ६ लाख नवीन रोजगार निर्माण केले जाण्याचा अंदाज आहे. चिनी उत्पादनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या तिच्या प्रयत्नाचा फायदा भारताला होण्याची आशा आहे.

‘ॲपल’च्या माध्यमातून पुढील वर्षी मार्चपर्यंत देशात दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनी आणि तिच्या पुरवठादारांनी सरकारला दिलेल्या अंदाजानुसार, यामध्ये सुमारे ७० टक्के महिलांचा समावेश असेल. ॲपलच्या भारतातील तीन कंत्राटी उत्पादक कंपन्या असलेल्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉन (आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स), आणि पेगाट्रॉन – यांनी आधीच ८०,८७२ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याव्यतिरिक्त, टाटा समूह, सालकॉम्प, मदरसन, फॉक्सलिंक (तमिळनाडू), सनवोडा (उत्तर प्रदेश), एटीएल (हरियाणा) आणि जबिल (महाराष्ट्र) या अन्य पुरवठादारांनी एकत्रितपणे सुमारे ८४,००० थेट नोकऱ्या जोडल्या आहेत.

chandrashekhar bawankule reacts on valmik karad case and supriya sule statement
वाल्मिक कराड प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रकरणावर लक्ष; दोषी आढळल्यास कारवाई अटळ, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
boom in the office space market in Pune
उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे…!
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
youth earning source villages
ओढ मातीची
industry Hinjewadi IT Park, Chakan MIDCpune pimpri chinchwad
हिंजवडी आयटी पार्क ते चाकण एमआयडीसी : नव्या वर्षात सुटो उद्योगांचे ग्रहण !
Pune Municipal Corporation takes strict stand to recover outstanding income tax  Pune news
थकबाकीदारांची आता नळजोडतोडणी; परिमंडळनिहाय पथकांची नियुक्ती

हेही वाचा >>> Keven Parekh : Apple च्या CFO पदी नियुक्ती झालेले केवन पारेख कोण आहेत? भारतीय वंशाच्या माणसावर मोठी जबाबदारी

ॲपलने अलीकडच्या वर्षांत भारतातील अकुशल मजूरवर्गीय (ब्लू-कॉलर) नोकऱ्यांची सर्वात मोठी एकल निर्माती म्हणून उदयास आली आहे, ज्यात प्रामुख्याने महिला आणि उद्योगात नव्याने आलेल्या कामगारांचा समावेश आहे. केंद्राने २०२० मध्ये स्मार्टफोनच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) सुरू केल्यापासून, ॲपल आणि तिच्या पुरवठादारांनी सुमारे १,६५,००० थेट नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. म्हणजेच एकूण ॲपलच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पाच ते सहा लाख रोजगार निर्माण होण्याचे अंदाजण्यात आले आहे.

 ‘चायना प्रारूपा’चा भारतात अंमल एक सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करणारे आणि पर्यायाने लक्षणीय रोजगाराच्या संधी निर्माण करणारे आपले ‘चायना प्रारूप’ ॲपलने भारतात यशस्वीरीत्या लागू केले आहे. गेल्या २५ वर्षांत याच प्रारूपातून, ॲपलने चीनमध्ये उत्पादन आणि ॲप विकसनाच्या क्षेत्रात ४० लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. तथापि अलीकडे चीनमधून भारतात पुरवठा साखळीचा एक भाग वेगाने स्थलांतरित करणारी ॲपल ही पहिली मोठी जागतिक मूल्य शृंखला आहे. वर्ष २०२१ पासून, ॲपलने चीनच्या बाहेर प्रथमच भारतात आयफोनची आणि सुटे भाग यांची जुळणी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, ॲपल आयफोनचे भारतातील उत्पादन सातत्याने वाढले आहे, सरलेल्या आर्थिक वर्षात ८५,००० कोटी रुपये मूल्याच्या वस्तू आणि सेवांची निर्यात ॲपलने केली आहे.

Story img Loader