देशातील ‘सिलिकॉन व्हॅली’ नावाचे शहर असलेल्या बंगळुरूमध्ये लवकरच एक मिनी आयफोन सिटी तयार होणार आहे. यासाठी फॉक्सकॉनने राज्य सरकारसोबत जमिनीचा करार पूर्ण केला आहे. या कारखान्याचे काम पूर्ण होताच ५० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये माहिती देताना फॉक्सकॉन होन हाय टेक्नॉलॉजी इंडियाने ही माहिती दिली. तसेच त्यांनी बंगळुरूच्या ग्रामीण भागात ३०० एकर जमीन खरेदी केली आहे, ज्यासाठी कंपनीने ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. फॉक्सकॉनच्या वतीने पॅरेंट कंपनी असलेल्या होन प्रिसिजन या मूळ कंपनीने हा व्यवहार केला आहे. आयफोन निर्मात्याने बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील देवनहल्ली तालुक्यात जमीन खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील पहिली जागतिक कंपनी

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपली सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चीनपासून दूर जात आपल्या उत्पादन बेसमध्ये विविधता आणण्याचा विचार करीत आहे. उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेच्या फायद्यांमुळे फॉक्सकॉन सारख्या आयफोन निर्मात्या भारताकडे आयफोन बनवण्यासाठी एक योग्य ठिकाण म्हणून पाहत आहेत. गुंतवणूक आणि विक्रीच्या आधारावर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये हाती घेतलेल्या मोबाइल उत्पादनासाठी ३५७.१७ कोटी रुपयांच्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहनांसाठी मंजूर झालेली फॉक्सकॉन डिसेंबरमध्ये पहिली जागतिक कंपनी ठरली आहे. खरं तर कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ साठी प्रोत्साहन दावा देखील सादर केला आहे.

कर्नाटकाशिवाय तेलंगणातही युनिट स्थापन करणार

मार्चमध्ये कर्नाटक सरकारने सांगितले की, फॉक्सकॉन राज्यात मोबाइल उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे ५०,००० लोकांना रोजगार मिळेल. फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ आणि सीएम बसवराज बोम्मई यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करारही केला. गुंतवणुकीची रक्कम जाहीर केली नसली तरी या सुविधेमुळे १००,००० लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. अहवालानुसार, कंपनी तेलंगणामधील उत्पादन सुविधेसाठी सुमारे २०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करेल आणि या सुविधेचा वापर iPods तयार करण्यासाठी करू शकेल.

भारतात ऍपलची मोठी वाढ

Apple भारतातील आपली वाढ आणि गुंतवणूक दुप्पट आणि तिप्पट करण्याचा विचार करीत आहे. Apple ने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये iPhone निर्यातीत चार पटीने वाढ नोंदवली, जी ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चेन्नईमधील कंपनीचे एक युनिट, व्हिएतनामच्या फॉक्सकॉन होआन हैद्वारे चालवले जाते, कोणत्याही क्षेत्रात एकाच ठिकाणी ३५,००० लोकांना रोजगार देते. उद्योगाच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत भारतातील एकूण ९०,००० कोटी स्मार्टफोन निर्यातीपैकी निम्मा वाटा Appleचा असणार आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतातून Apple ची विक्री जवळपास ४५ टक्क्यांनी वाढून ६ अब्ज डॉलर झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple mini iphone city will be built in bangalore more than 50 thousand people will get employment vrd