तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप संघर्षमय होते. वडील डोनाल्ड कूक शिपयार्डमध्ये काम करत होते आणि आई गेराल्डिन फार्मसीमध्ये काम करीत होती. कुटुंबाचे उत्पन्न घरखर्च भागवण्यासाठी पुरेसे नव्हते. घरखर्च चालवण्यासाठी ते लोकांच्या घरी वर्तमानपत्रे पोहोचवत असत. टीम कूक यांनी अनेक वर्षे फार्मसीमध्येही काम केले. पण असं म्हणतात की ना, संघर्ष, मेहनत, समर्पण ही यशाची शिडी आहे, जी चढून माणूस आकाशाला भिडतो. असेच काहीसे टीम कूक यांच्या बाबतीत घडले.

टीम कूक आज देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींपैकी एक बनले आहेत. कूक यांनी ऑबर्न विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी आणि ड्यूक विद्यापीठाच्या फुक्वा स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएचे शिक्षण घेतले. Apple ची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या IBM मध्ये १२ वर्षे काम केल्यानंतर कूक १९९८ मध्ये Appleमध्ये रुजू झाले. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल….

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास

Apple एकेकाळी बुडण्याच्या मार्गावर होती

Apple साठी टीम कूक यांच्यासाठी लकी मानली जातात. १९९८ मध्ये जेव्हा ते Apple कंपनीत रुजू झाले, त्या काळात कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. २००० मध्ये कूक अॅपलचे विक्री आणि व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष बनले. यानंतर २००४ मध्ये त्यांनी अंतरिम सीईओ आणि मॅकिंटॉश विभागाचे प्रमुखपद सांभाळले. २००९ मध्ये स्टीव्ह जॉब्स प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेले, त्या वेळी कूक यांना अंतरिम सीईओ म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्सच्या मृत्यूनंतर टीम यांना अॅपलचे सीईओ बनवण्यात आले.

आज ती २३५ लाख कोटींची कंपनी

२०११ मध्ये टीम कूक सीईओ बनल्यापासून ती २३५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्यासह जगातील सर्वात श्रीमंत टेक कंपनी बनली आहे. २०१८ मध्ये टीम कूक यांना बोनस म्हणून ८४ कोटी रुपये मिळाले. २०२२ मध्ये Apple चे CEO म्हणून टीम कूक यांचे वार्षिक पॅकेज ९९.४ दशलक्ष डॉलर म्हणजेच ८१५ कोटी रुपये होते. त्यानुसार त्यांची एका दिवसाची कमाई २.२३ कोटी रुपये होती. पण २०२३ मध्ये टीम कूकने स्वतःचे वार्षिक पॅकेज ४९ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ४०२ कोटी रुपये कमी केले. त्यानुसार आता त्यांची एका दिवसाची कमाई १.१० कोटी रुपये आहे.

हेही वाचाः Akshay Tritiya 2023 What to buy : अक्षय्य तृतीयेला करा शुभ सुरुवात; ‘या’ ५ गोष्टींमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता लाभ

टीम यांच्या यशाचे रहस्य काय?

टीम कूक पहाटे ३.४५ ला उठतात. ते उठल्यावर पहिली गोष्ट करतात ती म्हणजे ग्राहकांचे अभिप्राय आणि ई-मेल वाचणे. म्हणजेच टीम कूक त्यांच्या दिवसाची सुरुवात अॅपलच्या उत्पादनावर लोक काय प्रतिक्रिया आणि मत देत आहेत ते वाचून करतात. पण टीम कूक पहाटे हे का वाचतात? यालाही त्यांनी उत्तर दिले आणि सांगितले की, पहाटे ग्राहकांचे अभिप्राय वाचून त्यांना प्रेरणा मिळते आणि लोकांच्या फीडबॅकमुळे त्यांना नवीन उत्पादनांवर चांगले काम करण्यास मदत होते. यानंतर ते पहाटे पाचच्या सुमारास जिममध्ये जातात आणि मग त्यांचा पुढील दिनक्रम सुरू होतो.

हेही वाचाः मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचा नवा विक्रम; गेल्या ९ वर्षांत १७ कोटी ग्राहकांनी घेतले नवे गॅस कनेक्शन