वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने तिची प्रवासी वाहने आणि वाणिज्य वाहनांचे व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. गुरुवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, या प्रक्रियेसाठी १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune another one municipal corporation
दुसरी महापालिका ही पुण्याची निकड ? कोणी मांडली भूमिका
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
adani defence to acquire aircraft maintenance firm air works for rs 400 crore
वाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाच्या विस्ताराला बळ; ‘एअर वर्क्स’ कंपनीच्या संपादनाची घोषणा 
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क

टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने टीएमएल, टीएमएल कमर्शिअल व्हेइकल्स लिमिटेड (टीएमएलसीव्ही), टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (टीएमपीव्ही) या संमिश्र योजनेला मान्यता दिली. टीएमएलसीव्हीमध्ये वाणिज्य वाहन व्यवसायाच्या विलयास संचालक मंडळाने मान्यता दिली आणि प्रवासी वाहने, विद्युतशक्तीवर चालणारी वाहने आणि जेएलआर यासह प्रवासी वाहन व्यवसायासाठी दुसऱ्या कंपनीची योजना आहे. म्हणजेच विद्यमान टाटा मोटर्सचे दोन भाग होऊन दोन स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात येतील. परिणामी टाटा मोटर्सच्या भागधारकांना नव्याने अस्तित्वात येणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे समभाग प्राप्त होतील. या दोन्ही कंपन्या भांडवली बाजारात स्वतंत्र नावाने सूचिबद्ध असतील.

हेही वाचा >>>इन्फोसिसला ३२,००० कोटी ‘जीएसटी’ भरण्याची नोटीस, जुलै २०१७ ते २०२२ कालावधीसाठी कर चुकवल्याचा आरोप

नफ्यात भरीव वाढ

टाटा मोटर्सला जूनअखेर तिमाहीत ५,५६६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यात वार्षिक तुलनेत ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर महसूल ५.७ टक्क्यांनी वाढून १,०७,३१६ कोटींवर पोहोचला आहे.

Story img Loader