रेखा झुनझुनवाला यांच्या पाठीशी असलेले Aptech चे MD आणि CEO डॉ. अनिल पंत यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये हे सांगितले. Aptech ने एका निवेदनात म्हटले आहे, “मंगळवार (१५ ऑगस्ट २०२३ रोजी) व्यवस्थापकीय संचालक आणि CEO डॉ. अनिल पंत यांच्या दुःखद निधनाबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे.” “डॉ. पंत यांचे योगदान आणि ऊर्जा आता कंपनीला मिळणार नाही. कंपनीचे सर्व संचालक आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबाप्रति मनापासून शोक व्यक्त करीत आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकृतीच्या कारणास्तव पंत जूनमध्ये रजेवर गेले होते

पंत यांच्या निधनाची बातमी काही महिन्यांनंतर आली आहे. त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतली होती. कंपनीने त्यावेळी शेअर बाजाराला कळवले होते की, यंदा १९ जूनपासून पंत यांनी प्रकृती खालावल्याने अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतली होती.

हेही वाचाः Money Mantra : म्युच्युअल फंडांद्वारे कमी व्याजदरावर घ्या कर्ज, तुम्हाला चक्रवाढीचा पूर्ण लाभ मिळणार

कंपनीची १९ जून रोजी तातडीची बैठक झाली

१९ जून रोजी कंपनीची तातडीची बैठक झाली. कंपनीने सुरळीत कामकाजात सातत्य राखण्यासाठी मंडळाचे निवडक सदस्य आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांचा समावेश असलेली अंतरिम समिती स्थापन केलीय.

डॉ. अनिल पंत २०१६ पासून Aptech चे MD आणि CEO होते

डॉ. अनिल पंत २०१६ पासून Aptech चे MD आणि CEO होते. त्यांच्या नेतृत्वाखाली Aptech ला २०१८ साली CMMI संस्थेद्वारे लोक क्षमता मॅच्युरिटी मॉडेलमध्ये मॅच्युरिटी लेव्हल ३ वर मूल्यांकन करणे यांसारख्या अनेक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. Aptech चा पदभार स्वीकारण्यापूर्वी पंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि Sify Technologies यांसारख्या कंपन्यांशी संबंधित होते. २५ वर्षांहून अधिकच्या अनुभवात डॉ. अनिल पंत यांनी IT आणि कम्युनिकेशन क्षेत्रात १५ वर्षे गुणवत्ता, विक्री, विपणन, वितरण, उत्पादन व्यवस्थापन यासह विविध विभागांच्या जबाबदाऱ्या हाताळल्या.

हेही वाचाः अदाणी समूह एनडीटीव्हीनंतर ‘या’ मीडिया हाऊसमधील ५१ टक्के हिस्सा खरेदी करणार, बोर्डाने दिली मंजुरी

पंत २०१० ते २०१६ पर्यंत टीसीएसशी संबंधित होते

२०१० ते २०१६ दरम्यान पंत यांनी TCS येथे प्रमुख सल्लागार म्हणून काम केले आणि डोमेन चाचणीसाठी १०० दशलक्ष डॉलर जमा केले. २००८ ते २०१० पर्यंत उपाध्यक्ष म्हणून सिफी टेक्नॉलॉजीजशी संबंधित होते. त्यांनी ब्लो पास्ट, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, विप्रो आणि टॅलीसह विविध कंपन्यांमध्ये भूमिका बजावल्या आहेत. पंत यांनी बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी (बीई) आणि लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज मलेशिया येथून माहिती तंत्रज्ञानात पीएचडी केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aptech md ceo anil pant passes away vrd