Arvind Kejriwal House Renovation: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८-८ लाख रुपयांचा पडदा लावण्यात आला आहे. त्याचवेळी मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आलाय. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे; यावरून आता भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांचा खरा प्रामाणिकपणा आता उघड झाल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे; करोना साथीच्या काळात बंगल्याच्या सजावटीवर एवढा मोठा निधी का खर्च करण्यात आला, असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येतो आहे. त्यावरूनच भाजपनेही आता अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा