३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी ई-फायलिंग पोर्टलवर ३०.७५ लाखांहून अधिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाकडून अशी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये फॉर्म २९ B, २९ C, १० CCB इत्यादींमधील इतर लेखापरीक्षण अहवालांव्यतिरिक्त मूल्यांकन वर्ष २४ साठी दाखल केलेल्या अंदाजे २९.५ लाख कर लेखापरीक्षण अहवालांचा समावेश आहे.
हेही वाचाः अदाणी समूहाची सौरऊर्जा निर्मितीबाबत मोठी योजना, २०२७ पर्यंत १० गिगावॅट क्षमता तयार करणार
५५.४ लाख मेसेज पाठवण्यात आले
तसेच प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांच्या सोयीसाठी आउटरीच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालवले गेले आहेत. या आउटरीच कार्यक्रमांतर्गत करदात्यांना ई-मेल, एएमएस, सोशल मीडियावर ५५.४ लाख मेसेज पाठवण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाकडून प्राप्तिकर पोर्टलवर टॅक्स ऑडिट रिपोर्ट वेळेत सादर करण्यासाठी जनजागृती मेसेजही देण्यात आला. यासाठी सर्व व्हिडीओ इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवरही अपलोड करण्यात आले होते.
हेही वाचाः TATA समूहाच्या ‘या’ १२ शेअर्सनी कमावला प्रचंड नफा, ६ महिन्यांत दिला १५० टक्क्यांपर्यंतचा परतावा
h
कोणत्या करदात्यांना ऑडिट रिपोर्ट सादर करावा लागतो?
जे लोक एका आर्थिक वर्षात व्यवसायातून १ कोटी रुपये आणि व्यवसायातून ५० लाख रुपये कमावतात, त्यांना प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. जर कोणी असे करण्यात अपयशी ठरल्यास त्याच्या विक्री/उलाढाली/एकूण पावतीच्या ०.५० टक्के आणि १.५ लाख यापैकी जे कमी असेल ते दंड म्हणून जमा करावे लागेल. जर एखादा व्यापारी आणि व्यावसायिक ऑडिट रिपोर्टशिवाय आयटीआर सबमिट करतो, तर त्याचा आयटीआर अवैध होऊ शकतो.