अमेरिकेची चिपमेकर कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी भारतात गुंतवणूक करू शकते, अशी अपेक्षा गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती, त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत येत असताना भारतातील मंत्रिमंडळाने मायक्रॉनच्या २.७ बिलियन डॉलर म्हणजेच २२ हजार कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी दिल्याची बातमी समोर आली आहे. गुजरातमधील साणंद येथे हा प्लांट उभारला जाण्याची शक्यता आहे. मायक्रॉन १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल, ज्याचा अंदाज २ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मीडिया रिपोर्टमधील सूत्रांचा हवाल्यानुसार, भारत सरकार या प्लांटसाठी मायक्रॉनला १.३४ अब्ज डॉलर म्हणजेच ११ हजार कोटी रुपये PLI म्हणून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाची मंजुरी का आवश्यक होती?
पीएलआयच्या पॅकेजचा विचार करता कॅबिनेटची मंजुरी आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. मायक्रॉनची योजना यापूर्वी मोदी सरकारला समजली होती, परंतु मंत्रिमंडळाने तेव्हा त्याला मंजुरी दिलेली नव्हती. मायक्रॉनचे प्रवक्ते आणि भारत सरकारचे तंत्रज्ञान मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मंगळवारपासून सुरू झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान मोदी FedEx आणि मास्टरकार्डसह अनेक महत्त्वाच्या यूएस कंपन्यांच्या सीईओंना भेटतील आणि २२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये डिनर करतील.
अमेरिकन कंपन्यांवर बायडेन सरकारचा दबाव
रॉयटर्सला माहिती देताना यूएस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हाईट हाऊस अमेरिकन चिप कंपन्यांवर भारतात गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणत असताना मायक्रॉन टेक्नॉलॉजीची योजना समोर आली आहे. बायडेन यांना देशांतर्गत कंपन्यांनी चीनमध्ये व्यवसाय करण्याची जोखीम कमी करायची आहे, तसेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने चांगला हातभार लावला पाहिजे. व्हाईट हाऊसला भारतात गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या संख्येमुळे प्रोत्साहन मिळते, असंही अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे मायक्रॉन सुरक्षेची चाचपणी करण्यात मे महिन्यात अयशस्वी झाल्याचं सांगत चीनने प्रमुख देशांतर्गत इन्फ्रा ऑपरेटर्सना यूएसच्या सर्वात मोठ्या मेमरी चिपमेकरकडून उत्पादने खरेदी करण्यापासून प्रतिबंधित केले, ज्यामुळे बायडेन प्रशासनाचा राग आला. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने यावर भाष्य करण्यास नकार दिला.
हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता
मायकॉनचे हे युनिट गुजरातमधील साणंद होणार
तज्ज्ञांवर विश्वास ठेवल्यास मायकॉनचे हे युनिट गुजरातमधील साणंद येथे सुरू केले जाईल. अशा पद्धतीची युनिट्स सेमीकंडक्टर चिप्सची चाचणी आणि पॅकेज करतात, परंतु त्यांची निर्मिती करीत नाहीत. मायक्रॉन प्लांटमधील ग्राहकांसाठी चिप्स खरेदी आणि पॅकेज करू शकते. इतर कंपन्या त्यांच्या चिप्स शिपिंगपूर्वी चाचणीसाठी पाठवू शकतात. मायक्रॉनचा भारतीय प्लांट भारताचा सेमीकंडक्टर बेस मजबूत करेल, परंतु वास्तविक यशासाठी येथे उत्पादन करणे देखील खूप महत्त्वाचे असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी