Ashneer Grover Case: Fintech कंपनी BharatPe ने Ashneer Grover विरुद्ध नवीन केस दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या प्रकरणात भारतपेचे सह-संस्थापक ग्रोव्हर यांच्यावर कंपनीची गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप आहे. यासाठी त्याला माफीही मागावी लागली. अश्नीर ग्रोव्हरची संकटं काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. नुकताच तो न्यूयॉर्कला जात होता. मात्र, त्याला दिल्ली विमानतळावर थांबवून घरी पाठवण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्याला तपासात सहभागी होण्यास सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रोव्हरने गेल्या आठवड्यात X वरील पोस्ट हटवली होती

गेल्या आठवड्यात Ashneer Grover ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर BharatPe च्या Series-E फंडिंग फेरीदरम्यान इक्विटी वाटप आणि दुय्यम घटकांशी संबंधित माहिती पोस्ट केली होती. या फंडिंग फेरीचे नेतृत्व टायगर ग्लोबल करत होते आणि कंपनीचे मूल्य २.८६ अब्ज डॉलर होते. मात्र, नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान भारतपे यांच्या वकिलाने ग्रोव्हरवर गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचाः Money Mantra : वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्ती घ्यायची असेल तर ‘असं’ करा नियोजन, पुढचे आयुष्य होणार सुरक्षित

ग्रोव्हरच्या वकिलाने माफी मागितली

कंपनीच्या वकिलाने आरोप केला आहे की, अश्नीर ग्रोव्हरने भारतपेचा राजीनामा दिला आहे. तरीही गोपनीय माहिती स्वत:कडेच ठेवतो. हे रोजगार कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे. यावर ग्रोव्हरच्या वकिलाने न्यायालयासमोर माफीही मागितली. ग्रोव्हरवर अनेक खटले सुरू असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. पुढील तारखेला या प्रकरणावर न्यायालय पुढील सुनावणी करणार आहे.

हेही वाचाः अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, रिझर्व्ह बँकेकडून एक वर्षासाठी प्रशासकाची नियुक्ती

८१ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप होता

यापूर्वी भारतपेने ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन यांच्यावर ८१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला होता. या प्रकरणी ईओडब्ल्यूने मे महिन्यात ग्रोव्हर आणि माधुरी जैन आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भारतपेचा आरोप आहे की, ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून बोगस पेमेंटद्वारे कंपनीचे सुमारे ८१.३० कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. त्याला अमेरिकेला जाण्यापासून रोखल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी EOWने त्याला चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर ग्रोव्हर म्हणाले होते की, ते तपासात ईओडब्ल्यूला सहकार्य करत राहतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashneer grover case bharatpay filed a new case ashneer grover had to apologize vrd