Ashneer Grover Ishan Sharma Podcast: BharatPe चे सहसंस्थापक अशनीर ग्रोवर हे काही महिन्यांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. कंपनीशी त्यांचे असणारे व्यवहार व त्यानंतर उद्भवलेल्या वादामुळे त्यांच्यात झालेलंय ट्विटरवॉर यावरून बरीच चर्चा पाहायला मिळाली. त्यांच्या पत्नीचंही नाव एका प्रकरणात दिल्ली पोलिसांपर्यंत गेलं होतं. त्यानंतर बरेच महिने त्यावर चर्चा आणि तर्क-वितर्क पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा अशनीर ग्रोवर चर्चेत आले आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका २२ वर्षीय तरुणाची महिन्याची कमाई ऐकून अशनीर ग्रोवर यांना धक्का बसल्याचं दिसत आहे. एवढंच नाही, तर त्यांनी त्या तरुणालाच त्यांच्या खुर्चीवर बसण्याचं आमंत्रण त्यांनी दिलं.

नेमकं घडलं काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ इशान शर्मा नावाच्या एका २२ वर्षीय यूट्यूबरच्या पॉडकास्टमधला आहे. यामध्ये अशनीर ग्रोवर यांच्यासोबतच आशीष मोहपात्रा, सार्थक अहुजा आणि संजीव बिकचंदानी हेदेखील आहेत. इशान शर्मा या चौघांची मुलाखत घेत असून त्यातील एका संवादाची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल

इशान शर्माला आहे ३५ लाख कमाईची अडचण!

इशान शर्मानं या व्हिडीओमध्ये गेल्या महिन्यात ३५ लाख रुपयांची कमाई केल्याचं नमूद केलं आहे. पण या कमाईमुळे त्याला अडचण होत असल्याचं त्यानं नमूद करताच चौघा आमंत्रित पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. “गेल्या महिन्यात मी ३५ लाख रुपये कमावले. पण मला ही एक समस्या वाटतेय. मी हा छोटा नफा कमावतोय. पण त्याकडे बघून बाहेर जाऊन मोठा व्यवसाय करण्याची इच्छा होत नाहीये. मी त्यात अडकलोय. यावर तुमचं काय म्हणणं आहे अशनीर?”, असा प्रश्न इशाननं चौघा तज्ज्ञांना केला.

इशान शर्माचा हा प्रश्न ऐकून अशनीर ग्रोवर यांना आधी काय उत्तर द्यायचं हेच सुचलं नाही. थोडा वेळ त्यांचीही गडबड झाली. मग त्यांनी पुन्हा खातरजमा करण्यासाठी इशानला विचारलं, “तू महिन्याला ३५ लाख रुपये कमवतो?” त्यावर इशाननं “गेल्या महिन्यात” असं उत्तर दिलं.

Video: महिन्याला ३५ लाख कमावणारा २२ वर्षीय तरुण; कोण आहे इशान शर्मा, ज्यानं अशनीर ग्रोवर यांनाही धक्का दिला!

“तू इथे बसायला हवंस आणि आम्ही तुझी मुलाखत घ्यायला हवी”

इशानच्या उत्तरावर अशनीरनं मिश्किल टिप्पणी करताच उपस्थित इतर व्यक्तींमध्ये हास्याची लकेर उमटली. “तू एवढे पैसे कमावत असशील तर तू आमच्याजागी बसायला हवं आणि आम्ही तुझी मुलाखत घ्यायला हवी”, असं अशनीर ग्रोवर म्हणाले. त्यावर पुन्हा इशाननं “एवढी कमाई होत असल्यामुळे बाहेर जाऊन वेगळा कुठला मोठा व्यवसाय करण्याचा विचारच माझ्या मनात येत नाहीये”, असं इशान म्हणाला.

इशानच्या उत्तरानंतर समोरच्या पाहुण्यांनी एकमेकांना ते २२ वर्षांचे असताना किती रुपयांची कमाई होत होती? अशी विचारणा केली. त्यावर खुद्द अशनीर ग्रोवर यांनी ते २२ वर्षांचे असताना एकही रुपया कमावत नव्हते, असं सांगितलं. आशीष मोहपात्रा यांनी महिन्याला ३५ हजार रुपये कमवत होतो असं सांगितलं. तर सार्थक अहुजा आणि संजीव बिकचंदानी यांनी अनुक्रमे ५ हजार आणि दीड हजार रुपये कमवत होतो असं सांगितलं.

Zomato’s Deepinder Goyal Billionaire : झोमॅटोच्या शेअरमध्ये वाढ होताच सीईओ दीपंदर गोयल बनले अब्जाधीश

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्समध्येही इशान शर्माची चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर इशान शर्माच्या “लीक्ड हाऊ टू स्टार्ट ए बिझनेस इन २०२४” या पॉडकास्टमधल्या क्लिपवर नेटिझन्सच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

Story img Loader