Ashneer Grover on Narayana Murthy : Infosys चे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी भारतातील तरुणांना दर आठवड्याला ७० तास काम करण्यास सांगितले होते, ज्यावर BharatPe चे सह संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिताना अश्नीर ग्रोवर म्हणाले की, त्यांच्या बोलण्याने लोक नाराज झाले आहेत.
अश्नीर ग्रोव्हर पुढे म्हणाले की, नारायण मूर्तींचे ते विधान सामान्य जनतेला फारसे आवडले नाही, कारण अजूनही कामाचा निकाल कामाच्या ठिकाणी घालवलेल्या वेळेच्या आधारावर ठरवला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना असे वाटते की, तरुणांचा आळस भारताचा विकास रोखत आहे.
नाराज होण्याची अनेक कारणे : ग्रोव्हर
ग्रोव्हरने गंमतीने सांगितले की, भारतात जात, धर्म आणि क्रिकेट यांसारख्या गोष्टींबद्दल रागावण्यासारखे मुद्दे आहेत. पण क्रिकेट, धर्म, जात किंवा भाषा यावर रागावणेच आपल्याला एकत्र आणते.
हेही वाचाः मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, ईमेलवरून २० कोटींची मागणी; गुन्हा दाखल
भाविश अग्रवाल यांनी मानले
इन्फोसिसच्या संस्थापकाच्या या विधानाला ओला इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांचे समर्थन मिळाले आणि त्यांनी त्यांच्याशी पूर्णपणे सहमती दर्शवली.
काय म्हणाले नारायण मूर्ती?
नारायण मूर्ती यांनी भारताच्या कमी कार्याच्या उत्पादकतेची कारणेही सांगितली. ते म्हणाले की, सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कार्याची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. “भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत ज्या देशांनी प्रचंड प्रगती केलीय, त्यांच्याशी स्पर्धा करणे आपल्यासाठी अवघड आहे.” नारायण मूर्ती म्हणाले की, देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन हा देश माझा आहे म्हणा. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केले होते, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले. बर्याच वर्षांपासून दोन्ही देशांनी आणि त्यांच्या नागरिकांनी काही अतिरिक्त तास काम केले, असंही त्यांनी अधोरेखित केले.